5 Best Agriculture business ideas | शेती विषयक व्यवसाय कल्पना –

Small agriculture business ideas | शेती विषयक व्यवसाय कल्पना –

    भारत हा कृषिप्रधान देश असल्याने आपल्या भारत देशामध्ये असंख्य लोक शेती हा व्यवसाय करतात. शेती व्यवसाय करत असताना त्यासोबतच काही जोड व्यवसाय किंवा शेती विषयक व्यवसाय केले तर नक्कीच अजून फायदेशीर ठरू शकतात. आजच्या लेखामध्ये आपण असेच काही शेतीशी निगडित शेतीविषयक व्यवसाय कल्पना ( small agriculture business ideas ) बघणार आहोत.

Small agriculture business ideas | शेती विषयक व्यवसाय कल्पना –

Agriculture business ideas

१ . मधमाशी पालन / Beekeeping 🐝 –

   मध हा किती औषधी आहे किंवा मधाचे कित्येक उपयोग आहेत हे आपल्या सर्वांना माहीतच आहे त्यामुळे मधाच्या व्यावसायिक उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर मधमाशी पालन करणे आवश्यक आहे. भारतामधील सर्वात जुन्या व्यवसायांपैकी एक व्यवसाय हा मधमाशी पालन आहे. मधमाशी पालन म्हणजे मध गोळा करण्यासाठी मधमाशा पाळणे. मधाची वाढती मागणी लक्षात घेता मधमाशीपालन हा व्यवसाय योग्य रीतीने केल्यास फायदेशीर ठरू शकतो.

२ . फुलांची शेती / Flower Farming –

    फुले ही जवळपास सर्वच ठिकाणी मग त्यामध्ये देवघरांमध्ये असो , सणासमारंभाला असो तसेच इतर काही खास प्रसंगी असो किंवा दुःखद प्रसंगी असो प्रत्येक वेळी फुलांची आवश्यकता ही असतेच आणि त्यामुळेच फुलांची मागणी कधीही न कमी होणारी आहे. आपल्या देशामध्ये खूप सारे सण आणि उत्सव साजरी केले जातात आणि त्यासाठी फुलांची आवश्यकता ही असतेच. म्हणूनच जर आपण आपल्या शेतजमिनी नुसार तसेच आपल्या परिसरामधील वातावरणानुसार योग्य त्या फुलांची शेती केली तर नक्कीच फायदेशीर ठरू शकते.

३ . औषधी वनस्पतींची शेती / Herb Farming –

    आपल्या सर्वांना माहीतच आहे की औषधी वनस्पतींचे कित्येक उपयोग असतात.औषधी वनस्पती विविध उत्पादने बनवण्यासाठी सुद्धा वापरल्या जातात आणि हल्ली तर लोक आरोग्याबाबत अधिकच जागृत झाल्याकारणामुळे शक्यतो आयुर्वेदिक उत्पादनांना जास्त महत्त्व देतात. म्हणूनच जर आपण योग्य त्या औषधी वनस्पतींची निवड करून त्या औषधी वनस्पतींची शेती व्यवस्थितरीत्या केली तर नक्कीच फायदेशीर ठरू शकते.यासाठी आपण थोडासा मार्केट रिसर्च करून कोणत्या औषधी वनस्पतींची निवड करावी तसेच विक्री कशी करता येईल ही सर्व माहिती मिळवू शकता.

४ . मशरूम फार्मिंग / Mushroom Farming –

   मशरूमची मागणी सुद्धा दिवसेंदिवस वाढतच आहे त्यामुळे जर आपण मशरूम फार्मिंग व्यवसाय केला तर नक्कीच फायदेशीर ठरू शकतो.

    मशरूम खाल्ल्यामुळे शरीरासाठी वेगवेगळे फायदे मिळतात,त्यामुळे लोक मशरूम खाणे पसंत करतात आणि म्हणूनच विविध रेस्टॉरंट मध्ये मशरूम वापरून वेगवेगळ्या रेसिपीज बनवल्या जातात. फक्त रेस्टॉरंट मध्येच नाही तर कित्येक लोक स्वतःच्या घरी सुद्धा मशरूम पासून विविध रेसिपीज बनवून खातात. ग्राहकांना नेहमीच ताज्या मशरूमची आवश्यकता असते. म्हणूनच मशरूम फार्मिंग हा व्यवसाय योग्य रीतीने केल्यास फायदेशीर ठरू शकतो.

५ . ऍग्रो-ब्लॉगिंग / Agro Blogging –

    आज-काल बहुतेक लोक इंटरनेटचा उपयोग करतात त्यामुळे ब्लॉगिंग केल्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत शेती विषयक ज्ञान पोचवणे सोपे झाले आहे. त्यामुळेच ऍग्रो ब्लॉगिंग ही एक नवीन आणि चांगली कृषी व्यवसाय कल्पना ठरू शकते. त्याचबरोबर ही व्यवसाय कल्पना अतिशय कमी खर्चिक आहे परंतु यासाठी आपल्याजवळ शेतीविषयक ज्ञान असणे गरजेचे आहे. जर आपल्याजवळ शेतीविषयक ज्ञान असेल तर शेतीविषयक वेगवेगळ्या विषयांवर ब्लॉग आपण लिहू शकतो आणि ते लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. ऍग्रो ब्लॉगिंग उत्तमरीत्या केल्यास चांगली अर्निंग करता येऊ शकते.

      शेती हा एक चांगला व्यवसाय आहेच परंतु त्यासोबतच यापूर्वी सांगितल्याप्रमाणे मधमाशी पालन, फुलांची शेती, औषधी वनस्पतींची शेती, मशरूम शेती, ऍग्रो ब्लॉगिंग यांसारखे शेतीशी संबंधित इतर काही व्यवसाय केल्यास शेतीसोबतच अधिक फायदा आपल्याला मिळू शकतो. यापूर्वी सुद्धा आपण शेती विषयक काही व्यवसाय बद्दल माहिती जाणून घेतली होती त्याची लिंक सुद्धा पुढे देत आहोत.

⭕ Agriculture related business idea

⭕ शेती संदर्भामधील काही हटके व्यवसाय…

नक्की वाचा ..

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

शिक्षणाची कुठलीही अट नाही

सुरू करा हा व्यवसाय..

या व्यवसायाचे कोणतेही उत्पादन हमखास विकले जाते…

जाणून घ्या या व्यवसायाबद्दल अधिक माहित

Leave a Comment