दुग्ध व्यवसाय/ डेअरी फार्मिंग व्यवसाय | Dairy Farming Business |7 important factors in Dairy Farming

दुग्ध व्यवसाय/ डेअरी फार्मिंग व्यवसाय | Dairy Farming Business – 

     भारत हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशामध्ये शेती सोबत इतर जोड व्यवसाय सुद्धा केले जातात त्यामध्ये येणारा मुख्य व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय. ज्यांच्याकडे शेती आहे ते लोक आवर्जून हा व्यवसाय करतात. शेतकऱ्यांना हा व्यवसाय कसा सुरू करायचा याबद्दल नक्कीच माहिती असते परंतु जे लोक शेतकरी नाहीत त्यांना सुद्धा जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांच्यासाठी पुढील माहिती खूप उपयुक्त ठरेल. चला तर बघूयात दुग्ध व्यवसाय (Dairy Farming Business ) कसा सुरू करता येईल…

Dairy farming business

डेअरी फार्मिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी पुढील घटक आवश्यक आहेत :

– दुग्ध व्यवसाय सुरू करायचा ठरल्यास स्वतःच्या मालकीची शेतजमीन असणे खूप आवश्यक आहे.

– शेत जमीन असणे गरजेचे आहे ,कारण गाई म्हशींसाठी लागणारा चारा या शेतजमिनीमार्फत उपलब्ध करता येतो.

– जर शेतजमीन नसेल तर चारा विकत घेता येऊ शकतो परंतु दुग्ध व्यवसाय मधून मिळणारा नफा यामुळे कमी मिळू शकतो.

– गाई म्हशींचे ऊन ,वारा, पाऊस  यांपासून संरक्षण होण्यासाठी त्यांच्यासाठी शेड बांधणे किंवा निवारा तयार करणे खूप गरजेचे आहे.

– तुम्ही किती गाई किंवा म्हशी पाळणार आहात यानुसार शेडचे क्षेत्रफळ ठरवू शकता.

– गाई म्हशींना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी असावी.

– तसेच खाद्य किंवा चारा खाण्यासाठी गव्हानी सुद्धा असाव्यात.

– मलमुत्राचे व्यवस्थापन व्यवस्थित रित्या करावे.

– जोराचा पाऊस आल्यास आजूबाजूला पाणी साठू नये यासाठी गोठ्याची उंची व्यवस्थित धरावी.

– अधिक दूध मिळवण्यासाठी गाई म्हशींची योग्य निवड करणे गरजेचे आहे.

– गाई म्हशींमध्ये सुद्धा विविध जाती येतात.

– गाई म्हशींना काही रोग होऊ नये किंवा रोग नियंत्रणात आणता यावे, त्यांचे आरोग्य जपले जावे यासाठी वेळोवेळी लसीकरण करणे गरजेचे आहे यासाठी पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि त्यांच्याकडून गाई म्हशींची वेळोवेळी तपासणी करून घेणे गरजेचे आहे.

– पाणी आणि चारा योग्य त्या प्रमाणामध्ये आपल्याकडे उपलब्ध असले पाहिजे आणि गाई म्हशींना सुद्धा ते व्यवस्थित रित्या दिले गेले पाहिजे.

– चाऱ्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार पडतात ते पुढील प्रमाणे : 

१.हिरवा चारा- 

मका, हरभरा पिक ,मसूर, संकरित गवत यांसारखी पिके प्रथिने पूरक असलेली आहे. दूध उत्पादन वाढ करण्यासाठी पौष्टिक हिरव्या चाऱ्याची मदत नक्कीच होते.

२.सुका चारा- 

– सुक्या चाऱ्यामध्ये ज्वारी किंवा बाजरीचा चारा म्हणजेच कणीस तोडल्यानंतर शिल्लक राहिलेले ताठ, गव्हाचा कोंडा, कुटी यांचा समावेश होतो.

३. कॉन्सन्ट्रेट आणि मिनरल यांचे मिश्रण- 

– गाई म्हशींना खनिजांची कमतरता भासू नये म्हणून कॉन्सन्ट्रेट आहार आणि खनिज मिश्रण देणे आवश्यक आहे. पेंड किंवा खाद्य गाई म्हशींना खायला देऊ शकता.

  पुरेशा दूध उत्पादनासाठी हे सर्व प्रकार योग्य प्रमाणात मध्ये दिले गेले पाहिजे.

* पाणीपुरवठा –

गाई म्हशींना पिण्यासाठी व्यवस्थित रित्या पाण्याची व्यवस्था पाहिजे ,त्याचबरोबर वेळोवेळी गाई म्हशींना पाणी प्यायला दिले पाहिजे. तसेच गाई म्हशींची साफसफाई सुद्धा योग्य त्यावेळी केली पाहिजे.

 जर तुम्ही दुग्ध व्यवसाय स्वतः करणार असाल तर जास्त कामगारांची आवश्यकता भासणार नाही परंतु तुम्ही नोकरी करत असाल आणि त्यासोबत दुग्ध व्यवसाय सुरू करायचा असेल तर ज्या कामगारांना या व्यवसायाबद्दल ज्ञान आहे असे कामगार दुग्ध व्यवसायासाठी तुम्ही निवडू शकतात.

गाई म्हशींचे दूध तुम्ही हाताच्या सहाय्याने काढू शकता किंवा जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये गाई म्हशी पाळल्या तर दूध काढणी यंत्र सुद्धा वापरू शकता जेणेकरून वेळेची बचत होईल आणि कमी वेळेमध्ये, कमी मेहनतीमध्ये दूध काढता येईल.

प्रत्येक गावोगावी डेअरी सेंटर असते त्या ठिकाणी आपण दुधाची विक्री करू शकतो किंवा दुधापासून विविध उत्पादने जसे की दही, ताक ,तूप , पनीर बनवून त्यांची सुद्धा विक्री करू शकतो.

 अशा रीतीने दुग्ध व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

Leave a Comment