Best Health Benefits of Jaggery | गुळाचे आरोग्यदायी फायदे | Benefits of Jaggery in Marathi | Do you know more than 14 benefits of jaggery

Health Benefits of Jaggery | गुळाचे आरोग्यदायी फायदे – 

     खरंतर पूर्वीच्या काळी गुळाचा वापर साखरेपेक्षा मोठ्या प्रमाणावर केला जायचा. घरोघरी गुळ वापरून विविध पदार्थ सुद्धा बनवले जायचे, गुळाचा चहा तर आवर्जून बनवला जात असे. आता साखरेचे दुष्परिणाम लोकांच्या लक्षात यायला लागल्याने पुन्हा एकदा गुळाचा चहा किंवा गुळाचे इतर पदार्थ लोक बनवायला लागले आहेत म्हणजेच गुळाचा वापर पुन्हा एकदा सुरू झाला असून साखरेपेक्षा गुळ सध्या लोक वापरत आहेत. जे लोक अजूनही साखरेचा जास्त प्रमाणात वापर करतात त्यांनी सुद्धा साखरेचा कमी वापर करावा आणि त्या ऐवजी सेंद्रिय गुळाचा वापर करावा.

आता आपण गुळ शरीरासाठी कसा फायदेशीर आहे हे बघूयात…

Health Benefits of Jaggery | गुळाचे आरोग्यदायी फायदे – 

Health benefits of jaggery

– गूळ हा पोषक तत्वांनी समृद्ध आहे. गूळ हे लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वे जसे की बी-कॉम्प्लेक्स यांसारख्या आवश्यक खनिजांचे पॉवरहाऊस आहे. 

– गूळ हा एनर्जी बूस्टर आहे.गूळ हा जलद गतीने ऊर्जा वाढवतो. प्रक्रिया केलेल्या साखरेपेक्षा गुळ हा नैसर्गिक sweetner आहे.

– गूळ हा पचनासाठी सहाय्य करतो.गूळ शरीरातील पाचक एन्झाईम्स उत्तेजित करून पचनास मदत करतो. यामुळे बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते आणि नियमित आतड्यांसंबंधी हालचालींना प्रोत्साहन मिळते.

– गुळातील अँटिऑक्सिडंट्समुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. हे अँटिऑक्सिडंट्स मुक्त रॅडिकल्सशी लढा देतात, संक्रमणाचा धोका कमी करतात आणि शरीराच्या संरक्षण यंत्रणेला सपोर्ट करतात.

–  पारंपारिक औषधांमध्ये श्वसन समस्या दूर करण्यासाठी गुळाची शिफारस केली जात असे. गुळाचे अँटी-एलर्जिक गुणधर्म दमा, ब्राँकायटिस आणि श्वसनाच्या इतर आजारांची लक्षणे कमी करण्यास मदत करू शकतात.

–  गूळ यकृत साफ करून डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करतो. हे शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते, यकृताच्या निरोगी कार्यास प्रोत्साहन देते आणि संपूर्ण डिटॉक्सिफिकेशन प्रक्रिया व्यवस्थित करते.

– गूळ हा साखरेपेक्षा कमी प्रक्रिया करून बनवलेला असतो

– गुळामध्ये लो,फायबर, मिनरल्स, व कॅलरीज असतात. 

– गुळाचे सेवन केल्याने प्रतिकारक क्षमता वाढते त्याच्यामुळे आपले शरीर हे खोकला व सर्दी असल्या आजारांविरुद्ध लढू शकते.

– गुळ हा अशा व्यक्तींसाठी खूप चांगला आहे, ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे कारण गुळाचे सेवन हे ब्लड प्रेशर मेंटेन करण्यासाठी मदत करते.

– कोमट पाण्यात गुळाला विरघळून त्याचे सेवन केल्याने आपल्या शरीरातला तेज प्राप्त होते व ते निरोगी राहते.

–  जेवण झाल्यानंतर गुळाचे सेवन केल्याने ते आपली पचनक्रिया वाढवते व अन्न लवकर पचते .

– गुळाचे सेवन हे वजन कमी करण्यात देखील मदत करते.

– महिलांसाठी मासिक पाळीच्या काळात गुळ खाणे फायदेशीर ठरू शकते. त्यातील लोह कंटेंट लोहाची कमतरता टाळण्यास मदत करते, सामान्यत: मासिक पाळीच्या दरम्यान येणारा थकवा आणि अशक्तपणाची लक्षणे दूर करते.

साखरेचे तोटे –

– जास्त साखर सेवन केल्याने शरीराचे वजन वाढते

– साखरेचे सेवन हे टाईप 2 डायबिटीज होण्याचे कारण देखील बनू शकते. टाइप 2 डायबिटीस म्हणजे  डायबिटीज झालेली बॉडी ही इन्सुलिन तयार करू शकत नाही किंवा ती त्या इन्सुलिनला प्रतिकार करते.

– जास्त साखरेचे सेवन हे हार्ट अटॅक येण्याचे कारण देखील बनू शकते जो की आत्ताच्या काळातील मृत्यू होण्याचे कारण आहे 

– जास्त साखरेचे सेवन हे दात किडण्याचे कारण बनू शकते व ते लहान मुलांमध्ये तर जास्त आढळून येतेच त्या सोबतच मोठ्यांमध्ये सुद्धा आढळून येते.

    अशा रीतीने साखर आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे,परंतु गुळाचे शरीरासाठी चांगले फायदे ( Health benefits of jaggery) आहे.त्यामुळे साखरे ऐवजी गुळाचे सेवन केलेले कधीही चांगले,असे म्हणता येईल.बऱ्याच पदार्थांमध्ये किंवा रेसिपीज मध्ये साखरेऐवजी गुळ वापरला जाऊ शकतो,आणि बरेच लोक तसे करतात सुद्धा,साखरेऐवजी गुळाचा वापर.

व्यवसाय सुरू करायचा असल्यास मिळवा दहा लाख ते एक कोटी पर्यंत कर्ज..

जाणून घ्या काय आहे योजना...

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://iconikmarathi.com/stand-up-india-scheme/

Leave a Comment