Gift shop business | गिफ्ट शॉप व्यवसाय | How to start successful gift business | Best Business ideas 2024

Gift shop business | गिफ्ट शॉप व्यवसाय | How to start successful gift business | Best Business ideas 2024

     आपल्याकडे कुठलाही खास प्रसंग असल्यास एकमेकांना भेटवस्तू दिल्या जातात मग त्यामध्ये लग्न असो, वाढदिवस असो किंवा इतर काही सेलिब्रेशन असो अशा खास प्रसंगी लोक एकमेकांना भेटवस्तू देतात. भेटवस्तू ही फक्त वस्तू नसून एकमेकांप्रती असणारे प्रेम त्याद्वारे व्यक्त करता येते, त्यामुळे काही लोक तर काही खास प्रसंग नसेल तरीसुद्धा एकमेकांना गिफ्ट देणे पसंत करतात. त्यामुळे गिफ्ट शॉप सुरू करणे फायदेशीर ठरू शकतो. चला तर जाणून घेऊयात गिफ्ट शॉप ( Gift Shop Business ) व्यवसाय बद्दल अधिक माहिती…

Gift Shop Business| गिफ्ट शॉप कसे सुरू करावे ?

Gift Shop Business

– व्यवसाय सुरू करत असताना व्यवसाय योजना तयार करणे खूप आवश्यक आहे.

– व्यवसाय योजनेमध्ये व्यवसाय कुठे सुरू करणार आहात, गुंतवणूक किती करणार आहात, आवश्यक परवाने,कोणते गिफ्टस् गिफ्ट शॉप मध्ये ठेवणार आहात यांसारख्या अनेक गोष्टी समाविष्ट होतात.

– तुम्ही गिफ्ट शॉप व्यवसाय कमी गुंतवणुकीमध्ये आणि छोट्या स्तरावर सुरू करणार असाल तर घरामधून सुद्धा सुरू करू शकता परंतु जास्त गुंतवणुकीमध्ये आणि मोठ्या स्तरावर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर एखाद्या चांगल्या ठिकाणी जागा भाड्याने घेऊन किंवा स्वतःची जागा असेल तर त्या ठिकाणी गिफ्ट शॉप सुरू करू शकता.

– गिफ्ट शॉप सुरू करण्यासाठी ठिकाण निवडताना मार्केटचे ठिकाण किंवा गर्दीचे ठिकाण किंवा ज्या ठिकाणी ग्राहकांची गर्दी जास्त असते असे ठिकाण निवडा.

– गिफ्ट शॉप व्यवसायामध्ये योग्य डिस्ट्रीब्यूटरची निवड करणे गरजेचे आहे.

– योग्य डिस्ट्रीब्यूटर म्हणजे ज्या डिस्ट्रीब्यूटर कडे वरायटी ऑफ गिफ्ट म्हणजेच अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील असे गिफ्ट योग्य दरामध्ये असलेला वितरक होय.

– योग्य त्या डिस्ट्रीब्यूटर कडून तुम्ही होलसेल दरामध्ये गिफ्ट खरेदी करू शकता आणि योग्य त्या दरामध्ये ग्राहकांना विकू शकता.

– तुम्ही ज्या एरियामध्ये गिफ्ट शॉप सुरू केले आहे त्यानुसार गिफ्टचे दर ठरवू शकता, दर ठरवत असताना गिफ्टची गुणवत्ता लक्षात घेऊन दर ठरवावे.

– गिफ्टची गुणवत्ता आणि दर योग्य असेल तर नक्कीच ग्राहक वर्ग सुद्धा जास्त असेल.

– ग्राहकाचे लक्ष सर्वप्रथम एखादे शॉप बाहेरून कसे दिसते त्याकडे जाते आणि त्यावरूनच बरेचसे ग्राहक दुकानांमध्ये एन्ट्री घेतात.

– म्हणजेच बऱ्याच ग्राहकांना जर गिफ्ट शॉपचे स्ट्रक्चर किंवा इंटिरियर बाहेरून आकर्षक वाटले तर ते गिफ्ट शॉप कडे वळतात.

– त्यामुळे गिफ्ट शॉप चे इंटिरियर करत असताना आकर्षक करणे गरजेचे आहे जेणेकरून जास्तीत जास्त ग्राहक वर्ग गिफ्ट शॉप मध्ये येऊ शकेल.

– कुठलाही व्यवसाय सुरू करण्यासाठी त्या व्यवसायाची व्यवसाय नोंदणी करणे गरजेचे आहे.

–  व्यवसाय परवाना

– टीआयएन

– ऑक्यूपंसी प्रमाणपत्र 

– व्यवसायाचे नाव नोंदणी 

– GST  

– इतर आवश्यक परवाने

– तुम्ही तुमच्या गिफ्ट शॉप मध्ये अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील असे गिफ्ट ठेवू शकता मग त्यामध्ये लहान मुलांच्या खेळण्या, फ्लावर पॉट,परफ्यूम , ज्वेलरी, फोटो फ्रेम्स, ग्रीटिंग कार्ड्स,घड्याळे, चॉकलेट्स , मेकअप सामान, पर्सेस, सुगंधित मेणबत्त्या, विविध प्रकारच्या फ्रेम्स , स्टेशनरी अशा विविध प्रकारच्या भेटवस्तू ठेवू शकता.

– सर्वप्रथम आकर्षक असे ब्रँड नेम आणि लोगो निवडा.

– सोशल मीडिया मार्केटिंग ही मार्केटिंग पद्धत गिफ्ट शॉप व्यवसायाची मार्केटिंग करण्यासाठी वापरू शकता.

– विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गिफ्ट शॉप चे अकाउंट किंवा पेज तयार करा .

– शक्य असल्यास वेबसाईट सुद्धा बनवा.

– वेळोवेळी डिस्काउंट किंवा काही खास ऑफर्स ठेवा.

    अशा रीतीने गिफ्ट शॉप (Gift Shop Business ) व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.

⭕ शिक्षणाची कुठलीही अट नाही

⭕ सुरू करा हा व्यवसाय..

⭕ या व्यवसायाचे कोणतेही उत्पादन हमखास विकले जाते…जाणून घ्या या व्यवसायाबद्दल अधिक माहिती…👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://www.viral-talk.in/dairy-farming-business/

⭕ व्यवसाय सुरू करायचा असल्यास मिळवा दहा लाख ते एक कोटी पर्यंत कर्ज..

⭕ जाणून घ्या काय आहे योजना…👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://iconikmarathi.com/stand-up-india-scheme/

Leave a Comment