Winter skin care  | हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यावी | Home remedies for winter skin care | Winter skin care routine home remedies –

    हिवाळा सुरू झाला की आपोआपच आपली त्वचा कोरडी पडायला लागते याचे कारण म्हणजे हिवाळ्यामध्ये वातावरणामधील ओलावा किंवा आद्रता कमी होते. त्वचा कोरडी पडल्यामुळे त्वचेवर रफ पॅचेस तयार होतात त्याचबरोबर काही ठिकाणी क्रॅक्स सुद्धा जातात. कोरड्या त्वचेपासून वाचण्यासाठी बरेच लोक मॉइश्चरायझर्स तसेच बॉडी लोशन वापरतात परंतु आपल्या घरामध्ये सुद्धा असे बरेच ऑप्शन उपलब्ध आहेत की ज्याच्या मदतीने त्वचा कोरडी पडण्यापासून आपण वाचू शकतो. चला तर जाणून घेऊयात…

आपली त्वचा कोडी पडू नये यासाठी खोबरेल तेल त्वचेला लावणे चांगले असते म्हणून शक्यतो रात्री झोपताना आपण आपल्या चेहऱ्याला त्याचबरोबर हातापायांना सुद्धा खोबरेल तेल लावू शकतो. हे तेल रात्रीतून त्वचेमध्ये मुरते आणि त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही परंतु दिवसा खोबरेल तेल लावणे टाळावे कारण दिवसा आपण प्रवास करत असतो किंवा घराबाहेर असतो तर आपल्या चेहऱ्यावर धुळीकण किंवा इतर धूळ बसू शकते.

दूध सुद्धा कोरड्या त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. आपल्या चेहऱ्यावर थोड्या वेळासाठी दूध लावून ठेवा आणि दहा ते पंधरा मिनिटांनी आपला चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. असे हिवाळ्यामध्ये रोज केल्यामुळे आपली त्वचा अगदी मऊ राहील त्याचबरोबर मॉइश्चरायझर लावण्याची सुद्धा गरज पडणार नाही. थंडीमध्ये आपले ओठ सुद्धा उलतात त्यामुळे आपल्या ओठांवर सुद्धा दुधाची साय आपण लावू शकतो.

     दुधामध्ये अँटिऑक्सिडन्स आणि लॅक्टिक ऍसिड असल्यामुळे त्वचेवरील काळे डाग निघून जाण्यासाठी दूध मदत करते आणि त्वचेवर ग्लो सुद्धा आणते.

   आपल्या त्वचेसाठी बदाम तेल खूप उपयुक्त आहे. त्वचेला योग्य आद्रता बदाम तेल मिळवून देते. बदाम तेल त्वचेवर लावल्यामुळे त्वचा पूर्वीपेक्षा अधिक चमकदार आणि तेजस्वी बनते. रात्री झोपण्यापूर्वी आपल्या चेहऱ्यावर आपण बदाम तेल लावू शकतो आणि रात्रभर चेहऱ्यावर तसेच ठेवू शकतो असे केल्यामुळे सुद्धा आपली त्वचा अधिक मुलायम आणि छान बनते.

गावरान तूप आपल्या शरीरासाठी तर फायदेशीर आहे त्याचबरोबर आपल्या त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर आहे. आपण आपल्या त्वचेवर गावरान तूप अप्लाय करू शकतो असे केल्यामुळे आपली त्वचा कोरडी पडत नाही त्याचबरोबर थंडीमध्ये आपले ओठ उलतात त्यावर सुद्धा गावरान तूप लावल्यामुळे ओठ उलनार नाहीत.

    मधाचे सुद्धा कित्येक उपयोग आपल्याला माहित आहेत आणि मध आपल्या त्वचेसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. मध आपण आपल्या चेहऱ्यावर लावू शकतो. त्याचबरोबर फेस पॅक बनवत असताना सुद्धा त्यामध्ये मध टाकू शकतो. मध आपल्या त्वचेसाठी लागणारे मॉइश्चर त्वचेला पुरवते. आपली त्वचा मऊ आणि चमकदार बनवण्यामध्ये सुद्धा मधाचा खूप उपयोग होतो.

     आपल्या घरामध्ये कोरफड असेल तर आपण कोरफड डायरेक्ट चेहऱ्याला लावू शकतो परंतु जर आपल्या घरामध्ये कोरफड उपलब्ध नसेल तर अशावेळी एलोवेरा जेल आपण वापरू शकतो. एलोवेरा जेल आपली त्वचा कोरडी पडण्यापासून वाचवते त्याचबरोबर आपल्या त्वचेवर काळे डाग असतील तर ते घालवण्यामध्ये सुद्धा कोरफड मदत करते. कोरफड आपण थेट त्वचेला लावू शकतो किंवा इतर फेस पॅक मध्ये मिसळून सुद्धा लावू शकतो.

 अशा रीतीने अगदी आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेल्या गोष्टींपासून आपण आपल्या त्वचेला कोरडी पडण्यापासून वाचवू शकतो आणि आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकतो.

⭕2024 पासून आर्थिक बचत योग्यरीत्या करायची असेल तर ह्या टीप्स नक्की उपयोगी येतील.👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻https://www.viral-talk.in/finance-tips/?amp=1

⭕ दर महिन्याला एक रुपया भरून दोन लाख रुपये पर्यंतचा विमा⭕जाणून घ्या योजना नक्की काय आहे ..👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻https://iconikmarathi.com/bandhkam-kamgar-vima-yojana/?amp=1

Leave a Comment