हळद पावडर बनवण्याचा व्यवसाय | Turmeric Powder making business | Best business ideas 2024

हळद पावडर बनवण्याचा व्यवसाय | Turmeric Powder making business –

        हळद ही औषधी वनस्पती आहे. हळदीचे खूप उपयोग आहेत. हळदीचा वापर स्वयंपाकासाठी तर केला जातोच, परंतु विविध आजारांशी लढण्यासाठी सर्वात शक्तिशाली औषधी वनस्पती म्हणून हळदीला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. हळद पावडर चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी चेहऱ्यावर देखील लावली जाते. आपल्या भारतीय संस्कृती मध्ये स्वयंपाकामध्ये मसाल्यांना खूप महत्त्व आहे ,तर हळद पावडर स्वयंपाकातील अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. हळद तयार करण्याचा व्यवसाय तुम्ही घरून देखील सुरू करू शकता. कमी गुंतवणुकीमध्ये हळद पावडर तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो,  हळद पावडर तयार करण्याचा व्यवसाय ( Turmeric Powder making business )  सुरू केला तर नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. 

हळद पावडर बनवण्याचा व्यवसाय | Turmeric Powder making business –

Turmeric powder making business

 * हळद पावडर बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी व्यवसाय योजना तयार करणे खूप महत्त्वाचे आहे. व्यवसाय योजनेमध्ये हा व्यवसाय तुम्ही कुठे सुरू करणार आहात,या व्यवसायासाठी किती गुंतवणूक लागेल, कच्चा माल काय लागेल, आवश्यक मशीन कोणते लागतील, या व्यवसायाची मार्केटिंग कशी करणार आहात अशा गोष्टींचा समावेश होतो.

* आपण बनवत असलेल्या हळद पावडरची क्वालिटी उत्तम ठेवणे आणि पॅकेजिंग सुद्धा व्यवस्थित करावी जेणेकरून हळद पावडरची क्वालिटी बिघडणार नाही आणि ग्राहकांपर्यंत हळद पावडर व्यवस्थित रित्या पोहोचेल, हळद पावडरचा योग्य तो दर ठरवावा.

*हळद पावडर व्यवसाय छोट्या प्रमाणामध्ये सुरू करणार असाल तर अगदी घरामध्ये सुद्धा सुरू करता येऊ शकतो आणि त्यासाठी कमी गुंतवणूक लागेल परंतु जर जास्त प्रमाणात मोठ्या स्तरावर हा व्यवसाय सुरू करणार असाल तर या व्यवसायासाठी मशीनची आवश्यकता असेल आणि गुंतवणूक सुद्धा अधिक लागू शकते. जाणून घेऊयात हळद पावडर बनवण्याच्या व्यवसायाबद्दल इतर माहिती…

१. हळद पावडर तयार करण्यासाठी लागणारा आवश्यक कच्चामाल | Raw material required for making termeric powder –

  हळद पावडर तयार करण्यासाठी मुख्य कच्चामाल हळकुंड आहे. याव्यतिरिक्त हळद पावडर तयार झाल्यानंतर हळद पावडर पॅक करण्यासाठी पॉलिथिन बॅग लागतील. 

२. हळद पावडर तयार करण्यासाठी लागणारे आवश्यक मशीन्स | Machines required for making turmeric powder – 

हळद पावडर तयार करण्यासाठी पुढील मशीन वापरले जातात –

१. क्लीनर : या यंत्राच्या साहाय्याने हळदीच्या कच्च्या मालापासून खडे किंवा इतर काही कचरा असेल तर स्वच्छ केले जाते. 

२. ड्रायर: हळद ड्रायर वापरून वाळवली जाते. 

३. ग्राइंडिंग मशीन : या यंत्राच्या साहाय्याने हळद ग्राइंड केली जाते.

४.पॉवर ग्रेडर: हे मशीन बारीक हळद पावडर खाली ठेवते आणि हळदीची भरड वरती आणते. 

५.बॅग सीलिंग मशीन : या मशीनच्या मदतीने हळदीचे पॅकिंग केले जाते.

३.हळद पावडर बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे आवश्यक लायसन्स | Licence required for starting turmeric powder making business –

– सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या व्यवसायाचीची नोंदणी करावी लागेल. 

– त्याचप्रमाणे जीएसटी रजिस्ट्रेशन करणे देखील गरजेचे आहे. 

– हळद पावडर खाद्यपदार्थाअंतर्गत येत असल्यामुळे FSSAI ( food safety and security Authority of India ) लायसन्स काढणे गरजेचे आहे, हे लायसन्स काढल्यामुळे तुमच्या उत्पादनाच्या गुणवत्तेबद्दल ग्राहकाच्या मनात एक प्रकारचा विश्वास निर्माण होतो. 

– जर तुम्हाला हळद पावडर बनवण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करायचा असेल तर तुम्हाला तुमची फर्म प्रोप्रायटरशिप किंवा पार्टनरशिप अंतर्गत नोंदणीकृत करावी लागेल. 

४. हळद पावडर कशी तयार करतात | How to make turmeric powder –

जर तुम्ही हळद पावडर तयार करण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू करणार असाल तर वरती दिलेले मशीन वापरून तुम्ही हळद पावडर तयार करू शकता आणि जर कमी प्रमाणात हा व्यवसाय सुरू करणार असाल तर हळद पावडर तयार करण्यासाठी पुढील पद्धत वापरू शकता :

– हळद किंवा हळकुंडाचे लहान लहान तुकडे करून घ्या म्हणजे ते पूर्णपणे सुकण्यास मदत होईल. 

– त्यानंतर हळकुंडाच्या तुकड्यांचे धुळीपासून संरक्षण होण्यासाठी त्याला जाळीदार झाकणाने झाकून ठेवा

– हळद पूर्णपणे सुकेपर्यंत उन्हात वाळवा.

– वाळल्यावर फूड मिलमध्ये हळद बारीक करून घ्या. – त्यानंतर हळद पावडर चाळून घ्या, मोठे तुकडे पुन्हा गिरणीत टाका.

– पावडर थंड झाल्यावर घट्ट झाकण असलेल्या बरणीत साठवा.

– त्यानंतर हळद पावडर पॅकेट्स मध्ये पॅक करून तुम्ही विकू शकता. 

५. हळद पावडरची मार्केटिंग कशी करावी | How to do Marketing of turmeric powder –

– तुम्ही बनवलेल्या हळद पावडरला योग्य ते ब्रँड नाव देऊन विकू शकता .

– सुपर मार्केट, मॉल्स ,किराणा दुकान ,हॉटेल्स ,रेस्टॉरंट इत्यादी ठिकाणी विजीट करून त्यांच्याकडून हळद पावडर च्या मोठ्या ऑर्डर्स मिळवू शकता.

– त्याच बरोबर वर्तमानपत्रे ,लोकल चॅनल ,एफ एम रेडिओ इत्यादींवर जाहिरात देऊन हळद पावडरची विक्री वाढवू शकता .

– हळद पावडर ऑफलाइन पद्धतीबरोबरच ऑनलाईन पद्धतीने देखील विकता येऊ शकते.

– सोशल मीडिया च्या साह्याने देखील तुम्ही हळद पावडर ची मार्केटिंग करू शकता. 

⭕ सरकारतर्फे नव्या योजनेची घोषणा..

⭕ जाणून घ्या नक्की योजना काय आहे..

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

⭕Balloon decorator business| बलून डेकोरेटर बिझनेस आयडिया –

जाणुन घ्या अधिक माहिती..👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://iconikmarathi.com/balloon-decorator-business/#google_vignette

Leave a Comment