एक आकर्षक अशी सरकारी व्यवसायाची संधी | PM Wani Yojana

     आजच्या लेखामध्ये आपण एका किफायतशीर सरकारी व्यवसाय योजने बद्दल माहिती बघणार आहोत ज्यासाठी कमीत कमी गुंतवणूक आवश्यक आहे आणि ही व्यवसाय योजना स्वतःचे घर, दुकान किंवा ऑफिसमधून सुरू केली जाऊ शकते. ही व्यवसाय योजना पी एम वाणी योजना ( PM Vani Yojana ) म्हणून ओळखली जाते, ज्या अंतर्गत भारत सरकार देशभरामध्ये हाय-स्पीड आणि स्वस्त इंटरनेट सेवा उपलब्ध करत आहे. अनेकांना या सरकारी योजनेच्या फायद्यांबद्दल आश्चर्य सुद्धा वाटू शकते, विशेषत: अशा वेळी जेव्हा इंटरनेट आणि डेटा सहज उपलब्ध असतो. पंतप्रधान वाणी योजना कोणत्याही सेक्युरिटी डिपॉझिट किंवा परवान्याशिवाय फ्रँचायझींसाठी फायदे आणि चांगली संधी देते.

– PM वाणी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने 9 डिसेंबर 2020 रोजी मंजुरी दिली आहे.

– पंतप्रधान वाणी योजनेंतर्गत, सरकारचे देशभरात मोबाइल वाय-फाय हॉटस्पॉट सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांना कोणतीही हानी किंवा तोटा न होता इंटरनेट सेवा पुरवली जाईल.

– मोबाईल टॉवरमुळे आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होत असून, सरकार इंटरनेट सेवेसाठी पर्यायी उपाय शोधत असल्याने हा पुढाकार घेतला जात आहे.

– वाय-फाय हॉटस्पॉट्सची स्थापना केल्याने, लोकांना कोणत्याही नुकसानाशिवाय इंटरनेट सेवांचा लाभ तर मिळेलच, पण त्यामुळे देशभरात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.

फ्रॅंचाईजी ऑप्शन्स आणि अर्निंग | Franchise Options and Earnings –

PM वाणी योजना तीन प्रकारचे फ्रँचायझी पर्याय देते:

१. १.पी डी ओ फ्रँचायझी (PDO – Public Data Office)

२.PDOA – Public Data Office Aggregator

३. ॲप प्रोव्हायडर. 

पी डी ओ फ्रँचायझी (PDO – Public Data Office)-

– यासाठी कुठलीही रजिस्ट्रेशन फी किंवा फ्रेंचायसी फी नाही, एलिजिबिलिटी क्रायटेरिया नाही.

– पी डी ओ  फ्रँचायझी तुम्हाला तुमच्या आसपासच्या लोकांना इंटरनेट सेवा पुरवण्याची परवानगी देते.

– तुम्ही घरातून, तुमच्या दुकानातून किंवा तुमच्या ऑफिसमधून सुरुवात करत असलात तरीही, तुम्ही तुम्हाला हवे तितके हॉटस्पॉट स्थापित करू शकता आणि लोकांना कोणत्याही त्रासाशिवाय इंटरनेटशी कनेक्ट करू शकता.  -पी डी ओ  फ्रँचायझी मिळवण्यासाठी, तुम्हाला सरकार-मान्य पब्लिक डेटा ऑफिसर एग्रीगेटर (PDOA) शी संपर्क साधावा लागेल.

– ते तुम्हाला तुमचा व्यवसाय स्थापित करण्यासाठी सर्व आवश्यक डिटेल्स देतील आणि सहाय्य करतील.

पी एम वाणी योजनेसाठी अर्ज कसा करावा आणि ही योजना कसे कार्य करते ? How to apply for PM Wani Yojana?

–  तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाइटला www.pmwani.cdot.in भेट देऊन फ्रेंचायझीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

– वेबसाईटवर आल्यानंतर PDO portal वर क्लिक करा आणि नंतर त्या ठिकाणी फॉर्म ओपन होईल.

– फॉर्म व्यवस्थित रित्या भरा आणि सबमिट करा.

– आपल्याला समोर कॉन्टॅक्ट केला जातो, त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट डिटेल्स उपलब्ध असल्याने आपण सुद्धा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो.

– नंतर पीडीओ आणि PDOA यांच्यात सर्विस एग्रीमेंट होते.

– नंतर आपल्याला कोणत्याही कंपनीकडून ब्रॉडबँड कनेक्शन घ्यावे लागते.

– यानंतर आपण कस्टमरला डेटा पॅक कस्टमाइज करून देऊ शकतो.

– कस्टमर PDOA मार्फत दिले जाणारे ॲप डाऊनलोड करते आणि त्या ठिकाणी प्रीपेड प्लॅन सिलेक्ट करते.

– म्हणजे सर्वात आधी कस्टमर मार्फत PDOA ला पैसे जातात त्यानंतर PDOA मार्फत PDO ला पैसे मिळतात.

गुंतवणूक –

 – हा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी गुंतवणूक 10,000 रुपये इतकी कमी आहे.

– जसजसा तुमचा व्यवसाय वाढत जाईल, तसतसे तुम्ही गुंतवणूक करणे आणि तुमच्या ऑपरेशन्सचा विस्तार करणे सुरू ठेवू शकता.

– मुख्य खर्चांमध्ये राउटरची किंमत, डेटा आणि सर्विस प्रोव्हायडरला ( PDOA) कमिशन यांचा समावेश आहे.

– या व्यवसायातील नफ्याचे मार्जिन 10% ते 12% पर्यंत असते आणि ते तुमच्या ग्राहक बेसच्या साईज नुसार वाढते.

फायदे | PM Wani Yojana Benefits

– PM वाणी योजना तुमच्या आसपासच्या लोकांना तुमचा अतिरिक्त डेटा विकण्याच्या संधीसह अनेक फायदे देते. 

– पूर्वी, तुम्ही फक्त तुमच्यासाठी डेटा वापरायचा, पण आता तुम्ही तो इतरांसोबत शेअर करून पैसे कमवू शकता.

– तुम्ही हा व्यवसाय तुमच्या घरातून, दुकानातून किंवा ऑफिसमधून सुरू करू शकता आणि तुमच्या ग्राहकांच्या गरजेनुसार डेटा पॅक कस्टमाईज करू शकता. 

– डेटा विक्रीद्वारे कमाई करण्याव्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या वाय-फाय नेटवर्कवर प्रदर्शित होणाऱ्या जाहिरातींद्वारे कमाई देखील करू शकता. या जाहिराती वेबसाइट्स किंवा ॲप्सवरून असू शकतात आणि त्या फ्रँचायझींसाठी एक्स्ट्रा इन्कम सोर्स उपलब्ध करतात. 

– ॲक्सेस पॉईंट्स आणि फ्रँचायझींची संख्या अजूनही तुलनेने कमी असताना, 10 कोटी यूजर्स पर्यंत पोहोचण्यासाठी या योजनेचा विस्तार करण्याची सरकारची योजना आहे. हे साध्य करण्यासाठी सरकार आवश्यक पायाभूत सुविधांवर वेगाने काम करत आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत पीएम वाणी योजना ही एक अत्यंत लोकप्रिय व्यवसाय संधी बनण्याची अपेक्षा आहे.

   अशा प्रकारे PM वाणी योजना हा एक सरकारी उपक्रम असून कमीत कमी गुंतवणुकीसह फायदेशीर व्यवसाय संधी उपलब्ध करतो. 

PM Wani Official Website- Link

pm wani registrationLink

Watch full Video-

⭕ पोस्ट ऑफिसची चांगली परतावा देणारी योजना…

⭕ जाणून घ्या अधिक माहिती…

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://iconikmarathi.com/post-office-ppf-account/