इन्व्हेस्टमेंट नक्की कुठे करायची असा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. प्रत्येकाला इन्व्हेस्टमेंट साठी जे मार्ग सोयीस्कर वाटतात ते मार्ग ते स्वीकारतात परंतु एखाद्या व्यक्तीला सोयीस्कर वाटणारा गुंतवणुकीचा मार्ग दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा बरोबर वाटेलच असे नाही. परंतु पोस्ट ऑफिस योजना किंवा सरकारी योजनांवर काही लोकांचा विश्वास पटकन बसतो तर काही लोक अशा योजनांचा विचार करत नाही किंवा त्यांना माहिती सुद्धा नसतात. आज या ब्लॉगमध्ये पाच सरकारी गुंतवणूक योजना ( Government Investment Schemes) ज्या चांगले रिटर्न्स देऊ शकतात अशा योजनांबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. या योजना नक्कीच गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर पर्याय असू शकतात.

Government investment schemes

1. RBI Floating Rate Saving Bonds | आरबीआय फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉन्ड्स – 

– आरबीआय फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉन्ड्स ही सरकार-समर्थित बचत योजना असून जी विशेषतः भारतीय गुंतवणूकदारांसाठी डिझाइन केलेली आहे. 

– ही योजना सरकारी हमीसह स्पर्धात्मक असे व्याजदर देते. मार्केट आणि चलनवाढीच्या परिस्थितीनुसार दर सहा महिन्यांनी व्याजदरात सुधारणा केली जाते. 

– सध्याचा व्याजदर 8.05% आहे.

– या योजनेत किमान 1000 रुपयेच्या गुंतवणुकीसह गुंतवणूक सुरू करू शकता आणि कमाल मर्यादा नाही.

– लॉक इन पिरेड : ७ वर्षे आहे.

उदाहरण,

गुंतवणूक – 10,00,000 रुपये

वर्षे – 7

व्याज दर -8.05%

व्याज -7,19,386 रुपये

एकूण रक्कम – 17,19,386 रुपये

2. NHAI Invits Bonds | NHAI बॉण्ड्स –

– NHAI गुंतवणूक बॉण्ड्स ही भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) द्वारे जारी केलेली सरकार-समर्थित गुंतवणूक योजना आहे.

–  हे बॉण्ड्स ट्रिपल-ए कॅटेगरी अंतर्गत वर्गीकृत केले आहेत, याचा अर्थ ते 100% सुरक्षित आहेत.

–  NHAI गुंतवणूक बॉण्ड्स ८.५% परतावा देतात आणि ते करमुक्त आहेत.

–  या बॉण्ड्स मध्ये किमान गुंतवणूक 10,000 रुपये आहे आणि कमाल गुंतवणूक 50 लाख रुपये.

– या बॉण्डचा लॉक इन पिरेड पाच वर्षे आहे.

3. National Pension System (NPS) | नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) –

– नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) ही सरकार समर्थित सेवानिवृत्ती बचत योजना आहे.

– ही योजना सर्वाधिक परतावा देते. 

– NPS तुमचे पैसे इक्विटी, कॉर्पोरेट कर्ज, गव्हर्मेंट बॉण्ड्स आणि पर्यायी गुंतवणूक निधीमध्ये गुंतवते. 

– परतावा मार्केटवर अवलंबून आहे आणि गेल्या 10 वर्षांमध्ये सरासरी 10% आणि 13% दरम्यान आहे. 

-18 ते 70 वयोगटातील व्यक्ती या योजनेत किमान 500 रुपयांची गुंतवणूक करू शकतात आणि कमाल मर्यादा नाही.

– मॅच्युरिटी पिरेड : वयाच्या साठा व्या वर्षानंतर

4. Sovereign Gold Bonds –

– Sovereign Gold Bonds हे आरबीआयने जारी केलेल्या सोन्याच्या गुंतवणुकीचे डिजिटल स्वरूप आहेत.

– हे बॉण्ड्स सोन्याच्या दराच्या वाढीसह दरवर्षी 2.5% व्याज दर देतात.

– कमीत कमी गुंतवणूक मर्यादा : १ ग्रॅम

– जास्तीत जास्त गुंतवणूक मर्यादा : ४ किलोग्रॅम

– या बाँड्सचा मॅच्युरिटी कालावधी 8 वर्षांचा आहे.

5 . Senior Citizen Savings Scheme (SCSS)|ज्येष्ठ नागरिक बचत योजना –

– ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी डिझाइन केलेली सरकार-समर्थित योजना आहे.

– ही योजना वार्षिक ८.२% व्याजदर देते, जे तिमाही क्रेडिट केले जाते. 

– या योजनेसाठी मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षे आहे, त्यात अतिरिक्त 3 वर्षे वाढवण्याचा पर्याय आहे. 

– किमान गुंतवणूक 1000 रुपये आहे आणि कमाल मर्यादा ३० लाख रुपये आहे.

     सरकारी गुंतवणूक योजना ( Government Investment Schemes) संपत्ती वाढवू पाहणाऱ्या व्यक्तींसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्याय आहे ,असे म्हणता येईल. 

⭕ पोस्ट ऑफिसची चांगली परतावा देणारी योजना…

⭕ जाणून घ्या अधिक माहिती…

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://iconikmarathi.com/post-office-ppf-account/