नाशिकमध्ये 12 जानेवारीला “राष्ट्रीय युवा महोत्सवाचे” उद्घाटन करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी …नाशिकमधील १८ रस्ते १२ जानेवारीला बंद … | PM Narendra Modi Nashik Visit | PM to inaugurate National Youth Festival at Nashik on 12 Jan

     स्वामी विवेकानंदजी यांचा आदर्श आणि विचारांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी “राष्ट्रीय युवा दिन” साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारी रोजी नाशिक ,महाराष्ट्र येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे त्यावेळी ते देशातील तरुणांना संबोधित करणार आहेत.

PM Narendra Modi Nashik visit राष्ट्रीय युवा महोत्सव

      यावर्षी 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड करण्यात आलेली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तपोवन येथील मैदानावर या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे, यानिमित्ताने खुप मोठी तयारी केली जात आहे.

      विविध शासकीय विभागांच्या सहकार्याने या वर्षी राष्ट्रीय युवा दिन जिल्ह्यातील युवा कार्य विभागाच्या सर्व क्षेत्रीय संघटनांद्वारे साजरा केला जाईल. देशातील प्रमुख शहरे आणि 750 जिल्हा मुख्यालयांमध्ये “रस्ता सुरक्षा जागरूकता कार्यक्रम” आयोजित केले जातील.

    नाशिकमधील 18 रस्ते 12 जानेवारीला बंद होणार आहेत.12 जानेवारी रोजी नाशिक शहरातील तब्बल 18 रस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्या पूर्वी वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहेत. सकाळी ६ पासून ते उद्घाटन कार्यक्रम संपेपर्यंत रस्ते बंद राहणार आहेत. 

    उद्या म्हणजेच 12 जानेवारी 2024 या दिवशी पंतप्रधान मोदी नाशिक दौऱ्यावर येत असल्याकारणाने नाशिक शहर विद्युत रोषणाईनं उजळलं आहे. गोदातीरावर सुद्धा आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे.

     दिनांक 12 जानेवारी, शुक्रवार या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यासाठी येत असल्याकारणाने वाहतुकीच्या मार्गामध्ये काही प्रमाणामध्ये बदल करण्यात आलेला आहे. महोत्सवा ठिकाणी येणाऱ्यांसाठी पार्किंग व्यवस्था सुध्दा करण्यात आलेली आहे.परंतु काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे व या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळवण्यात येणार आहे. 

– लक्ष्मीनारायण मंदिर ते तपोवनकडे जाणारा मार्ग.

– निलगिरी बाग पाट चौफुली ते तपोवनकडे जाणारा मार्ग.

– विडी कामगार पाट चौफुली ते निलगिरी बागकडे जाणारा मार्ग.

– संतोष टी पॉइंट ते स्वामिनारायण चौकीकडे जाणारा मार्ग.

– तपोवन चौफुली ते कार्यक्रमस्थळाकडे जाणारा मार्ग.

– अमृतधाम चौफुली ते मिरची सिग्नलकडे जाणारा मार्ग.

– जनार्दन स्वामी मठ टी पॉइंट ते तपोवनकडे जाणारा मार्ग.

–  स्वामिनारायण चौक ते कार्यक्रमस्थळाकडे जाणारा मार्ग.

– काट्या मारुती चौक ते संतोष टी पॉइंटकडे जाणारा मार्ग.

– काळाराम मंदिर पासून ते नाग चौक आणि काठ्या मारुती चौकीकडे जाणारा मार्ग.

– सरदार चौक ते काळाराम मंदिरकडे जाणारा येणारा मार्ग.

– नांदूर नाका ते तपोवनकडे जाणारा मार्ग.

– रासबिहारी ते निलगिरी बागकडे जाणारा मार्ग.

– तारवाला चौक ते अमृतधामकडे जाणारा मार्ग.

– दिंडोरी नाका ते काट्या मारुती चौकाकडे जाणारा मार्ग.

– टाकळी गाव, काठे चौकाकडून सिद्धिविनायक चौक, अमृतधामकडे जाणारा मार्ग.

– सीतागुंफा मंदिर ते काळाराम मंदिराकडे जाणारा मार्ग.

– मालेगाव स्टॅन्ड ते रामकुंड, गाडगे महाराज पुलापर्यंत जाणारा-येणारा मार्ग.

– नाशिक रोड पासून मुंबईकडे जाणारी अवजड वाहने फेम सिग्नल, डीजीपीनगर, वडाळागाव, कलानगर, पाथर्डी फाट्यावरून मुंबईकडे ह्या पध्दतीने 

– द्वारका उड्डाणपुलावरून ये-जा करता येणार.

– अमृतधाम, रासबिहारीमार्गे ये-जा.

– नांदूर नाका ते तपोवनकडे जाणारी अवजड वाहतूक बिटको, नाशिक रोड, जेल रोड, जत्रा चौफुलीमार्गे.

– दिंडोरी, पेठ रोडकडून येणारी वाहने ही पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅन्ड,रविवार कारंजा, रामवाडी पुलामार्गे इतरत्र.

⭕ चिक्की आणि लाडू बनवण्याचा व्यवसाय…

⭕Chikki and laddu making business 

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

⭕ Makar Sankranti special business ideas 

⭕ मकर संक्रांत स्पेशल बिझनेस आयडियाज

⭕ व्यवसायाची आयडिया घ्या आणि सुरू करा तुमचा आवडता व्यवसाय…

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

Leave a Comment