Chikki and laddu making business | चिक्की आणि लाडू बनवण्याचा व्यवसाय | One of the Best food business idea for 2024

     गोड पदार्थ खाणे जवळपास प्रत्येक व्यक्तीलाच आवडते, अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारे गोड खाद्यपदार्थ म्हणजे लाडू आणि चिक्की. लाडू आणि चिक्की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या इन्ग्रेडियंट पासून बनवली जाते. लाडूच्या प्रकारांमध्ये मोतीचूर लाडू, बेसन लाडू, रव्याचे लाडू, शेंगदाणा लाडू असे वेगवेगळे प्रकार येतात.परंतु बेसन लाडू आणि मोतीचूर लाडू हे स्वीट मार्ट मध्ये सर्वाधिक विकले जात आहेत. चिक्कीचे सुद्धा असे वेगवेगळे प्रकार आहेत ,चिक्की मध्ये ड्रायफ्रूट्स घालून चिक्की अधिक पौष्टिक बनवली जाऊ शकते. तुम्ही तुमच्या एरियानुसार, तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता की तुम्हाला नेमकी कोणते लाडू आणि चिक्की बनवण्याचा व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु त्यासाठी पुढील माहिती नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. चला तर जाणून घेऊयात चिक्की आणि लाडू बनवण्याच्या व्यवसायाबद्दल अधिक माहिती…

Table of Contents

Chikki and laddu making business

– व्यवसाय योजना तयार करणे हे कुठल्याही व्यवसायासाठी खूप महत्त्वाचे पाऊल आहे.

– तुम्ही हे ठरवणे गरजेचे आहे की तुम्हाला हा व्यवसाय घरून सुरवात करायचा आहे की या व्यवसायामध्ये जास्त गुंतवणूक करून याचे युनिट सुरू करायचे आहे. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला या व्यवसायासाठी लागणारे ठिकाण आणि गुंतवणूक हे निश्चित करायचे आहे.

– नंतर व्यवसाय योजनेमध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचे लाडू किंवा चिक्की बनवणार आहात, त्यांचे दर काय ठेवणार आहात, ब्रँड नेम काय असेल, पॅकेजिंग कशी कराल, मार्केटिंग कशी करावी,परवाने यांसारख्या गोष्टींचा समावेश होईल.

– अशा रीतीने सर्व गोष्टींचा विचार करून व्यवस्थित रित्या व्यवसाय योजना तयार करून घ्या.

– कुठल्याही व्यवसायासाठी ठिकाणाची योग्य निवड करणे खूप महत्वाचे आहे.

– तुम्ही हा व्यवसाय घरून सुद्धा सुरू करू शकता परंतु जर जास्त गुंतवणूक करून मोठ्या स्तरावर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमची स्वतःची जागा असेल तर त्या ठिकाणी कंपनी उभारू शकता किंवा स्वतःची जागा नसेल तर मार्केटच्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी ग्राहकांची गर्दी जास्त प्रमाणात असते त्या ठिकाणी हा व्यवसाय सुरू करू शकता.

– कोणत्या प्रकारचे लाडू किंवा चिक्की बनवणार आहात हे ठरवल्यानंतर तुम्ही हे पदार्थ बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची लिस्ट तयार करा आणि त्यानुसार खरेदी करा.शेंगदाणे, साखर ,तेल ,तूप, गूळ, रवा ,बेसन, राजगिरा, मनुके ,काजू ,बदाम यांसारख्या गोष्टी तर लागतीलच त्यासोबतच इतर आवश्यक गोष्टींची सुद्धा यादी तयार करा.

– आवश्यक सामग्री होलसेल दराने खरेदी केल्यास अधिक नफा मिळू शकतो तसेच काही आवश्यक गोष्टी शेतकऱ्यांकडून सुद्धा खरेदी करू शकता.

– लाडू आणि चिक्की बनवण्यासाठी तुम्हाला मोठी भांडी, चमचे, उलथनी, कढाया,पातेले, फिल्टरिंग चमचे/झाऱ्या, चाकू, ट्रे अशी भांडे लागू शकतात. त्यासोबतच मिक्सर, गॅस या गोष्टी सुद्धा आवश्यक आहेत.

– परंतु जर तुम्ही हा व्यवसाय अगदी मोठ्या प्रमाणावर सुरू करणार असाल तर तुम्ही चिक्की आणि लाडू बनवण्यासाठी मशीन सुद्धा खरेदी करू शकता.

–  उद्योग आधार

–  FSSAI 

– GST registration 

– Trade licence 

– Shops and Establishment Registration

याव्यतिरिक्त सुद्धा काही लायसन्स लागत असेल तर त्याची माहिती घेऊन ते लायसन्स काढणे गरजेचे आहे जेणेकरून भविष्यामध्ये काहीही अडचण येणार नाही.

– आपल्या व्यवसायाला योग्य ते ब्रँड नेम द्या.

– आपण बनवत असलेल्या लाडू आणि चिक्कीची चव आणि गुणवत्ता नेहमी चांगली राखा.

– लाडू आणि चिक्कीची पॅकेजिंग अगदी व्यवस्थित रित्या करा, जेणेकरून ग्राहकांपर्यंत व्यवस्थित रित्या पोहोचू शकेल.

– लाडू आणि चिक्कीचा दर योग्य तो ठेवा.

–  ग्राहकांकडून फीडबॅक घेऊन आपल्या प्रॉडक्टची गुणवत्ता अधिकाधिक चांगली करण्याचा प्रयत्न करा.

– सोशल मीडिया मार्केटिंग ही पद्धत तुम्ही वापरू शकता याद्वारे विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्ही बनवत असलेले चिक्की ,लाडू यांचे हाय क्वालिटी फोटोज, त्यासोबत त्याबद्दलची माहिती असे सर्व शेअर करू शकता आणि शक्य असल्यास घरपोच डिलिव्हरी सुद्धा ऑफर करू शकता.

– पॅकेजिंग खूप आकर्षक पणे करा आणि त्यासोबतच पर्सनलाईजड पॅकेजिंग ऑप्शन्स सुद्धा स्पेशल सणांसाठी किंवा खास प्रसंगासाठी देऊ शकता.

– लोकल स्टोअर्स व्हिजिट करून त्यांना आपल्या प्रॉडक्ट बद्दल माहिती देऊन त्यांच्याकडे सुद्धा विक्रीसाठी ठेवू शकता.

– लोकल इव्हेंट्स किंवा एक्जीबिशन्स सुद्धा अटेंड करा जेणेकरून तुमचे प्रॉडक्ट तुम्हाला त्या ठिकाणी विक्रीसाठी ठेवता येतील.

Makar Sankranti special business ideas ⭕ मकर संक्रांत स्पेशल बिझनेस आयडियाज👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻https://iconikmarathi.com/makar-sankranti-special-business-idea/

Leave a Comment