मकर संक्रांति स्पेशल बिझनेस आयडिया | Best Makar Sankranti special business ideas PART 2

मकर संक्रांति स्पेशल बिझनेस आयडिया | Best Makar Sankranti special business ideas –

नमस्कार,

    आपण ” मकर संक्रांति स्पेशल बिझनेस आयडिया ” असे आर्टिकल यापूर्वीही पब्लिश केलेले आहे आणि त्यामध्ये सुद्धा काही बिझनेस आयडिया सांगितलेल्या आहेत. आज आपण त्याचा PART 2 बघणार आहोत म्हणजेच अजून काही बिझनेस आयडिया बघणार आहोत की ज्या मकर संक्रांतीच्या आधीपासूनच काही दिवस हे व्यवसाय आपण करू शकतो.

Makarsankranti special business ideas

मकर संक्रांतीच्या वेळी आवर्जून हळदी कुंकवाचे कार्यक्रम अगदी प्रत्येक घरोघरात केले जातात. आणि ह्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमांमध्ये महिला एकमेकींना वाण देतात. आपण एकमेकींना काय वाण देऊ शकतो हे काही काळापुरते मर्यादित जरी असले तरी आज काल वेगवेगळ्या प्रकारचे वाण एकमेकींना दिले जातात. मग अगदी पुस्तकांपासून ते इतर गोष्टी सुद्धा वाणांच्या स्वरूपात दिल्या जातात.

    तुम्ही सुद्धा अशा वेगवेगळ्या वस्तू असतील किंवा इतर धातूंची वेगवेगळी भांडी, गरजेच्या वस्तू किंवा इतर खूप साऱ्या वरायटी आहे की ज्या आपण वाण म्हणून देऊ शकतो त्या सर्व तुमच्या शॉप मध्ये विकण्यासाठी ठेवू शकता. हा व्यवसाय मकर संक्रांतीच्या वेळी हमखास चालू शकतो.

     पर्यावरणाला आपण वापरत असलेल्या कुठल्याही वस्तू पासून हानी पोहोचू नये याची काळजी अगदी प्रत्येकाने घेतली पाहिजे. मकर संक्रांतीच्या वेळी तुम्ही वेगवेगळे इको फ्रेंडली डेकोरेशन आयटम्स,त्याचबरोबर इको फ्रेंडली पतंग यांसारख्या इको फ्रेंडली वस्तू बनवून विकू शकता.

मकर संक्रांतीच्या वेळी बऱ्याच ठिकाणी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. जे लोक इतर वेळी काळा रंग परिधान करत नसतात ते लोक सुद्धा मकर संक्रांतीच्या वेळी काळा रंग घालने पसंत करू शकतात. म्हणून तुम्ही पारंपारिक असे कपडे ज्यामध्ये साड्यांचा समावेश हमखास असेल व त्यासोबतच इतर कपड्यांचा सुद्धा समावेश करा आणि अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना हवे असलेले कपडे तुमच्या दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवा.

    हल्ली मॅचिंग ट्रेंड म्हणजेच पूर्ण कुटुंबाने एक सारखेच कपडे घालणं खूप चर्चेत आहे , त्यामुळे तुम्ही सुद्धा असे काही कॉम्बिनेशन्स तयार करून विक्रीसाठी ठेवू शकता.

– बऱ्याच ठिकाणी मकर संक्रांतीच्या निमित्ताने पतंग उडवण्याच्या स्पर्धा किंवा इतर कार्यक्रम आयोजित केलेले असतात. अशा ठिकाणी लोकांची भरपूर प्रमाणामध्ये गर्दी होते मग आपण त्या ठिकाणी केटरिंग सर्विसेस प्रोव्हाइड करू शकतो त्यामध्ये अगदी पारंपारिक पदार्थ असेल संक्रांतीसाठी बनवले जाणारे पदार्थ त्यासोबतच इतर पदार्थ सुद्धा विक्रीसाठी ठेवू शकतो.

इंटरनेटमुळे आणि ऑनलाईन पद्धतीने अगदी घरामधूनच कुठलीही कला किंवा कुठल्याही प्रकारचे शिक्षण आपण घेऊ शकतो आणि ही एक चांगली गोष्ट आहे. तुम्हाला सुद्धा अशी काही कला अवगत असेल तर मग त्यामध्ये मकर संक्रांतीच्या पारंपारिक रेसिपी किंवा इतर काही कौशल्य जे तुमच्याकडे असेल त्याचे क्लासेस तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता. अगदी एका दिवसाचा सुद्धा ऑनलाईन क्लास तुम्ही घेऊ शकता. उदाहरणार्थ, तुम्हाला जर उत्तम रित्या मेकअप करता येत असेल तर मकर संक्रांतीसाठी पारंपारिक पद्धतीने कमी साहित्यात कसा मेकअप करता येईल,याचा क्लास तुम्ही घेऊ शकता.

हल्ली सर्वांकडे कॅमेरा फोन उपलब्ध असले तरीसुद्धा बऱ्याच लोकांना कॅमेऱ्यामधून हाय क्वालिटी फोटो काढायला खूप आवडते. म्हणूनच जर तुमच्याकडे कॅमेरा असेल किंवा तुम्ही फोटोग्राफर असाल तर ज्या ठिकाणी पतंग उडवण्याच्या स्पर्धा किंवा मकर संक्रांतीनिमित्त इतर काही इव्हेंट्स ऑर्गनाईज केलेले असतात त्या ठिकाणी फोटोग्राफी सर्विस तुम्ही प्रोव्हाइड करू शकता किंवा तुमचे फोटोग्राफी शॉप असेल तर त्या ठिकाणी सुद्धा वेगवेगळ्या ऑफर्स सणानिमित्त ठेवू शकता असे केल्यामुळे नक्कीच कस्टमरची गर्दी वाढते.

    अशाप्रकारे कुठलाही व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता परंतु कुठलाही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी मार्केट रिसर्च करणे गरजेचे आहे त्याचबरोबर ज्या गोष्टी आपल्याला माहित नाही त्या माहिती करून घेणे सुद्धा गरजेचे आहे.

Makar Sankranti special business ideas
⭕ मकर संक्रांत स्पेशल बिझनेस आयडियाज

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://iconikmarathi.com/makar-sankranti-special-business-idea/

Leave a Comment