महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देणारी योजना….| Navin Swarnima Yojana| Best Government schemes 2024

महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देणारी योजना….| Navin Swarnima Yojana –

    सरकारकडून विविध योजना वेगवेगळ्या हेतूने जनतेसाठी राबवल्या जात असतात त्यामध्ये सरकारच्या विविध विभागामधून महिलांसाठी सुद्धा वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात. आज अशाच एका योजनेबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत की ज्या योजनेमुळे महिलांना स्वावलंबी बनण्यामध्ये म्हणजेच स्वतःचे काहीतरी सुरू करण्यासाठी कमी व्याजदरामध्ये कर्ज मिळू शकते आणि ही योजना आहे नवीन स्वर्णिमा योजना ( Navin Swarnima Yojana). तर जाणून घेऊयात या योजनेबद्दल अधिक माहिती…

Navin Swarnima Yojana

– सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयामार्फत नवीन स्वर्णिमा योजना ही मागासवर्गीय उद्योजक महिलांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे.

– उद्योग करण्यासाठी दोन लाखांपर्यंत कर्ज महिलांना नवीन स्वर्णिमा योजनेमार्फत मिळणार आहे.

– नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फायनान्सस डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NBCFDC) यांच्याद्वारे नवीन स्वर्णिमा योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

– महिलांना व्यवसाय करण्यासाठी कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देणे आणि महिलांना स्वावलंबी बनवणे असा नवीन स्वर्णिमा योजनेचा हेतू आहे.

नवीन स्वर्णिमा योजनेसाठी आवश्यक पात्रता | Navin Swarnima Yojana Eligibility-

– अर्जदार व्यक्ती महिला असणे आणि भारताची रहिवासी असणे आवश्यक आहे.

– अर्जदारासाठी वयोमर्यादा 18 ते 55 वर्ष आहे.

– अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा जास्त नसावे.

– अर्जदाराला व्यवसायाबद्दल आवश्यक ज्ञान असणे आवश्यक आहे.

– नवीन स्वर्णिमा योजनेचा लाभ मागासवर्गीय महिला घेऊ शकतात.

नवीन स्वर्णिमा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे| Necessary Documents for Navin Swarnima Yojana –

– पासपोर्ट साईज फोटो

– आधारकार्ड

– रेशनकार्ड

– मतदान कार्ड

– रहिवासी पुरावा 

– जातीचा दाखला

– बँक खाते

– मोबाईल क्रमांक

कमाल कर्ज मर्यादा: .2 लाख रूपये (प्रति लाभार्थी)

आर्थिक प्रणाली :

N.B.C.F.D.C. कर्ज: 95%

चॅनल भागीदाराचा वाटा: 05% 

व्याज दर :

N.B.C.F.D.C. कडून चॅनल भागीदारांना: 2% p.a. 

चॅनल भागीदारांकडून लाभार्थींना : 5% p.a.

नवीन स्वर्णिमा योजनेसाठी अर्ज | Application –

आपल्या जवळील एस.सी.ए (S.C.A) कार्यालयामधून नवीन स्वर्णिमा योजनेसाठीचा अर्ज मिळवावा लागेल त्यानंतर हा अर्ज व्यवस्थित रित्या भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जमा करा आणि अर्ज सबमिट करा. पात्र ठरलेल्या अर्जदारांना नवीन स्वर्णिमा योजनेचा लाभ मिळेल.

एस.सी.ए (S.C.A) यादी : येथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा.

⭕ आठवी किंवा चौदा वर्षाखालील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण..

⭕जाणून घ्या अधिक माहिती…

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

Leave a Comment