आता मिळू शकतात दर महिन्याला 9250 रुपये,जाणून घ्या नक्की योजना काय आहे| Post Office Monthly Income Scheme in marathi | Best Post office schemes 2024 –

      आपण आर्थिक दृष्ट्या सेक्युर व्हावं, असे प्रत्येकालाच वाटते म्हणूनच तर विविध योजनांमध्ये आपण गुंतवणूक करत असतो. पोस्ट ऑफिस मार्फत सुद्धा विविध योजना राबवल्या जातात, आज आपण अशाच एका योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत की जी खात्रीशीर रिटर्न्स आपल्याला मिळून देते ही योजना आहे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना [ Post Office Monthly Income Scheme ( POMIS ) ]. जाणून घेऊयात या योजनेबद्दल अधिक माहिती…

Post Office Monthly Income Scheme | पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना –

Post office monthly income scheme

– पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही योजना ठेव गुंतवणुकीवर हमी परतावा देते.

– पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेअंतर्गत आपण गुंतवणूक केलेल्या रकमेवर आपल्याला व्याज मिळते आणि आपल्याला मासिक उत्पन्न सुरू होते.

– आपल्याला जर रेगुलर आणि गॅरंटीड मासिक उत्पन्न हवे असेल तर पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही एक उत्तम योजना आहे.

POMIS कसे काम करते? How does Post Office Monthly Income Scheme works ?

– आपल्याला एक रकमी रक्कम जमा करावी लागते.

– त्यानंतर या योजनेचा कार्यकाळ संपेपर्यंत आपल्याला दर महिन्याला व्याज मिळते.

– या योजनेचा कार्यकाळ संपल्यानंतर आपली ठेव रक्कम आपल्याला परत मिळते.

Features of Post Office Monthly Income Scheme  | पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचे वैशिष्ट्ये –

– पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेस भारत सरकारचे समर्थन आहे त्यामुळे आपोआपच ही योजना अधिक विश्वासार्ह वाटते.

– पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेमध्ये गुंतवणूक करणे हा एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे.

– या योजनेमुळे खात्रीशीर परतावा आपल्याला मिळतो.

– तसेच या योजनेमुळे नियमित मासिक उत्पन्न आपल्याला सुरू होते.

– एका पोस्ट ऑफिस मधून दुसऱ्या पोस्ट ऑफिस मध्ये आपण उघडलेले खाते हस्तांतरित करू शकतो त्यासाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही.

– या योजनेचा कार्यकाळ म्हणजेच पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर पुढील पाच वर्षांसाठी आपण पुन्हा गुंतवणूक करू शकतो.

– ही योजना आपल्याला नामांकनाची सुविधा देते म्हणजेच खाते उघडते वेळी किंवा खाते उघडल्यानंतर आपण नॉमिनीचे नाव देऊ शकतो.

*Income Tax बद्दल माहिती-

कोणतेही आयकर लाभ नाहीत,आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत ठेव रकमेवर कोणतीही कर कपात नाही. तसेच पोस्ट ऑफिसद्वारे या योजनेअंतर्गत कोणताही टीडीएस (Tax Deducted at Source) नाही. या योजनेअंतर्गत मिळणारे व्याज मात्र करपात्र आहेत.तुम्हाला टॅक्स रिटर्न दरम्यान “Income from Other Sources” अंतर्गत व्याज उत्पन्न घोषित करणे आणि तुमच्या आयकर स्लॅबनुसार आयकर भरणे आवश्यक आहे.

Who can open MIS account | पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेसाठी अकाउंट कोण उघडू शकते | Eligibility for Post office monthly income scheme –

– भारतीय रहिवासी या योजनेसाठी पात्र आहेत.

– या योजनेसाठी स्वतंत्र अकाउंट किंवा दोन किंवा तीन व्यक्तींनी मिळून जॉइंट अकाउंट सुद्धा उघडता येऊ शकते.

– पालक किंवा आई वडील त्यांच्या minor पाल्याच्या नावाने सुद्धा अकाउंट उघडू शकतात.

– दहा वर्षीय किंवा त्यापेक्षा अधिक वर्षाचे मायनर्स सुद्धा हे खाते उघडू शकतात आणि खाते ऑपरेट करू शकता.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेसाठी खाते कसे उघडावे ?

– कॅश किंवा चेक देऊन आपण खाते उघडू शकतो परंतु आपण चेक दिल्यास चेक क्लिअर झाल्याच्या तारखेनंतर खाते उघडले जाते.

– या योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी पोस्ट ऑफिस मधून आपल्याला या योजनेसाठीचा फॉर्म मिळेल त्यानंतर तो फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रांसह सबमिट करावा.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे | Documents required for post office monthly income scheme –

– पासपोर्ट साईज फोटोज 

– पत्ता पुरावा : आधार कार्ड,बँक खाते पासबुक किंवा पासपोर्ट

– ओळखीचा पुरावा : आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड ,ड्रायव्हिंग लायसन्स ,रेशन कार्ड

Deposit limits of Post office monthly income scheme| पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेसाठी डिपॉझिट लिमिट –

कमीत कमी डिपॉझिट रक्कम – १००० रुपये

सिंगल अकाउंट साठी जास्तीत जास्त डिपॉझिट रक्कम – ९ लाख रुपये

जॉईंट अकाउंट साठी जास्तीत जास्त डिपॉझिट रक्कम – १५ लाख रुपये

* एक व्यक्ती जास्तीत जास्त ९ लाख रुपये गुंतवणूक या योजनेमध्ये करू शकते ( जॉईंट अकाउंट मधील रक्कम धरून )

Interest of POMIS | व्याज दर –

– सध्या वार्षिक व्याजदर 7.40% आहे.

– व्याजदराची रक्कम मंथली बेसिस वर पेड केली जाते.

– व्याज दर खाते उघडण्याच्या दिवशी जो आहे तोच MIS च्या संपूर्ण कार्यकाळात राहील,त्यानंतर व्याजदरात बदल झाले तरी त्यात बदल होणार नाही.

* पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेमध्ये मॅच्युरिटी पिरेड पाच वर्ष आहे.

Pre mature closure | मुदतपूर्तीपूर्वी जर पैसे काढायचे असतील तर काही नियम –

– खाते उघडल्यानंतर एक वर्षानंतर खाते मुदतीपूर्वी बंद केले जाऊ शकते. 

– जर 3 वर्षापूर्वी खाते बंद केल्यास, जमा रकमेतील 2% कपात केली जाईल आणि उर्वरित रक्कम मिळेल. 

– जर 3 वर्षांनंतर खाते बंद केल्यास, जमा रकमेतील 1% कपात केली जाईल आणि उर्वरित रक्कम मिळेल.

उदाहरणे: 

 -जर आपल्या खात्यामध्ये १ लाख रु. जमा असतील ते खाते 3 वर्षापूर्वी बंद केल्यास  2,000/- रुपये (रु. 1 लाखाचे 2%) वजा केले जातील आणि  उर्वरित रक्कम  म्हणजेच 98,000/- रुपये (रु. 1 लाख वजा रु. 2,000/-)मिळतील.

– जर आपल्या खात्यामध्ये १ लाख रु. जमा असतील ते खाते 3 वर्षानंतर बंद केल्यास  1,000/- रुपये (रु. 1 लाखाचे 1%) वजा केले जातील आणि  उर्वरित रक्कम  म्हणजेच 99,000/- रुपये (रु. 1 लाख वजा रु. 1000/-)मिळतील.

आपण पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास आपल्याला पाच वर्षानंतर किती रक्कम मिळेल यासाठी विविध तीन उदाहरणे बघुयात…

Examples

एकरकमी रक्कम (Lump sum Amount)  Rs. 1,00,000Rs. 9,00,000Rs. 15,00,000
वार्षिक व्याजदर (Annual Interest Rate)7.4%7.4%7.4%
मुदत ( Term ) 5 years5 years5 years
मासिक उत्पन्न ( Monthly Income)Rs.616.67Rs.5,550Rs.9,250
एकूण व्याजदर ( Total Interest )Rs.37,000RS.3,33,000Rs.5,55,000
एकूण रक्कम (Total amount ) Rs.1,37,000Rs.12,33,000Rs.20,55,000

⭕ आठवी किंवा चौदा वर्षाखालील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण..

⭕जाणून घ्या अधिक माहिती…

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻https://iconikmarathi.com/rteadmission/?amp=1