कमी गुंतवणुकीमध्ये सुरू करता येणारा व्यवसाय | Fruit juice centre business |Best Business opportunities 2024

कमी गुंतवणुकीमध्ये सुरू करता येणारा व्यवसाय | Fruit juice centre business | ज्यूस सेंटर व्यवसाय –

        हल्ली धावपळीच्या जगामध्ये सर्वच अगदी इन्स्टंट किंवा पटकन व्हावे असे वाटते म्हणजेच कमी कालावधीमध्ये जास्त काम किंवा कमी वेळेत काम पूर्ण करणे असं काहीसं चित्र आहे. पूर्वी आणि अजूनही बरेच लोक फळांचे थेट सेवन करणे पसंत करतात परंतु हल्लीच्या धावपळीच्या जगामध्ये सगळं अगदी पटापट होण्यासाठी बरेच लोक फळ खाण्याऐवजी फळांचा ज्यूस पिणे पसंत करतात. हेल्दी लाइफस्टाइल मेंटेन करण्यासाठी फळे खूप महत्त्वाचे आहे. फळांचा ज्यूस पिल्याचे शरीरासाठी अनेक फायदे सुद्धा आहे. म्हणूनच ज्यूस सेंटर हा व्यवसाय जर योग्य ठिकाणी योग्य रीतीने सुरू केला तर नक्की फायदेशीर ठरू शकतो. चला तर जाणून घेऊयात ज्यूस सेंटर ( Juice Centre ) व्यवसायाबद्दल अधिक माहिती….

Fruit juice centre business | ज्यूस सेंटर व्यवसाय –

Fruit juice centre business

१. ज्यूस सेंटर व्यवसायासाठी व्यवसाय योजना तयार करा | Business plan for Fruit juice centre business – 

– ज्यूस सेंटर सुरू करण्यासाठी व्यवसाय योजना तयार करणे खूप महत्त्वाचे आहे.

– व्यवसाय योजनेमध्ये ज्यूस सेंटर कुठे सुरू करणार आहात, या व्यवसायासाठी कच्चामाल कुठून खरेदी करणार आहात, या व्यवसायासाठी कोणते मशीन आवश्यक आहे, तसेच इतर सामग्री काय लागेल, गुंतवणूक किती करणार आहात, हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणते लायसन्स लागतील, मार्केटिंग कशी करायची या सर्व गोष्टींचा समावेश होतो.

२. ज्यूस सेंटर व्यवसायासाठी ठिकाणाची निवड | Location for fruit juice centre –

– प्रत्येक व्यवसायासाठी ठिकाणाची योग्य निवड करणे खूप महत्त्वाचे असते कारण एखाद्या व्यवसायासाठी जर आपण चुकीचे  ठिकाण निवडले तर तो व्यवसाय यशस्वी होऊ शकत नाही परंतु जर अचूक ठिकाणाची निवड व्यवसायाला मोठ्या उंचीपर्यंत नेऊन ठेवू शकते.

– ज्यूस सेंटर हा व्यवसाय पुढील ठिकाणी सुरू केला जाऊ शकतो :

– योगा क्लासेस जवळ

– जिम जवळ

– गर्दीच्या ठिकाणी जसे की शाळा, कॉलेजेस, रेल्वे स्टेशन्स, बस स्टॅन्ड, गार्डन्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे अशा प्रकारे…

– शॉपिंग मॉल्स

– मार्केट मध्ये

– टुरिस्ट प्लेसेस

३. ज्यूस सेंटर सुरू करण्यासाठी गुंतवणूक –

– ज्यूस सेंटर हा व्यवसाय तुम्ही किती मोठ्या प्रमाणावर सुरू करणार आहात यावर गुंतवणूक अवलंबून आहे.

– जर सुरुवातीला एकदम कमी गुंतवणुकीमध्ये हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर एका ज्यूसर सोबत सुद्धा तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता परंतु जर जास्त गुंतवणूक करून मोठ्या पातळीवर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तसे सुद्धा नक्की करू शकता.

 ४. ज्यूस सेंटर साठी आवश्यक कच्चामाल आणि इतर उपकरणे –

– ज्यूस बनवण्यासाठी ताजी फळे आवश्यक आहेत आणि ही ताजी फळे थेट शेतकऱ्याकडून किंवा होलसेलर कडून खरेदी करू शकता.

– इतर उपकरणे :

– ज्यूसर्स

– व्यावसायिक ब्लेंडर 

 – रेफ्रिजरेटर्स

– मेजरींग टूल्स

– कटिंग बोर्ड

 – बर्फ मशीन 

– स्टोरेज कंटेनर

– ग्लासेस आणि स्ट्रॉ

– नॅपकिन्स

– ट्रे

– चमचे

– स्टूलस्,खुर्च्या आणि टेबल

–  इतर आवश्यक भांडी

– ज्यूस सोबत ड्रायफ्रूट्स किंवा आईस्क्रीम सुद्धा देऊ शकता.

५. ज्यूस सेंटर सुरू करण्यासाठी जागा –

– आपण किती मोठ्या प्रमाणावर ज्यूस सेंटर सुरू करणार आहोत यावर खरंतर जागा ठरते ,परंतु साधारणतः 100 ते 800 स्क्वेअर फिट जागा ज्यूस सेंटर व्यवसायासाठी लागू शकते.

६. ज्यूस सेंटर मधून मिळणारा नफा –

थेट ग्राहकांना ज्यूस विकल्यानंतर 50% ते 70% पर्यंत एकूण नफा मिळवू शकतो.

७.ज्यूस सेंटर सुरू करण्यासाठी आवश्यक परवाने –

–  FSSAI licence एफएसएसएआई 

– कर नोंदणी / जीएसटी रजिस्ट्रेशन

– व्यापार परवाना

 ८.मार्केटिंग  | Fruit juice centre business –

– हल्ली सर्वात महत्त्वाची मार्केटिंगची पद्धत म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंग. सोशल मीडिया मार्केटिंग करून ज्यूसचा व्यवसाय जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचावला जाऊ शकतो तसेच तुमच्याकडे ज्यूस घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांना ज्यूस आवडल्यानंतर पॉझिटिव्ह रीव्ह्यूज सुद्धा नक्की सोशल मीडिया अकाउंट वर देण्याची रिक्वेस्ट करा.

– ज्यूस सेंटर अगदी स्वच्छ आणि टापटीत ठेवा तसेच आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करा.ग्राहकांना चांगल्या क्वालिटीचे ज्यूस देण्याचा प्रयत्न करा. अशा काही गोष्टी अमलात आणल्यामुळे नक्की आपल्याकडे एकदा आलेला ग्राहक पुन्हा पुन्हा येईल तसेच इतर ग्राहकांना सुद्धा आपल्या ज्यूसच्या क्वालिटी बद्दल सांगेल.

– आपला व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा जर जास्त गुंतवणूक करण्याची तयारी असेल तर ठीक ठिकाणी बॅनर्स लावू शकता तसेच स्थानिक रेडिओ चॅनल वर जाहिरात करू शकता व फूड ब्लॉगर्सकडून सुद्धा जाहिरात करू शकता.

⭕ गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांना मिळणार सहा हजार रुपये

⭕ जाणून घ्या या योजनेबद्दल अधिक माहिती…

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://iconikmarathi.com/pradhanmantri-matru-vandana-yojana/

Leave a Comment