Budget 2024 |  अर्थमंत्री नक्की काय म्हणाल्या…? | आर्थिक बजेट | Union Budget 2024 | Nirmala Sitharaman Budget 2024 –

Budget 2024 |  अर्थमंत्री नक्की काय म्हणाल्या…? | आर्थिक बजेट | Union Budget 2024 | Nirmala Sitharaman Budget 2024 –

        गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडला. निर्मला सीतारामन यांचा हा सहावा अर्थसंकल्प होता.निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाला ( Budget 2024 ) संसदेमधील इतर सदस्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा दाद दिली आणि निर्मला सीतारामन यांनी केलेल्या घोषणांचा स्वागत केलं.

    या अर्थसंकल्पामध्ये विविध घोषणा त्यांनी केल्या त्या आपण पुढे बघणारच आहोत.

     यंदाचा अर्थसंकल्प हा लोकसभा निवडणुकीपूर्वी सादर होत असल्यामुळे देशवासियांचे लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागून होतेच, अर्थसंकल्प सादर करत असताना सुरुवातीला निर्मला सीतारामन यांनी मागील दहा वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारने कोणकोणती विकास कामे केली याबद्दल सांगितले, एकूणच 57 मिनिटे त्यांनी भाषण केले.

Budget 2024

– कर रचनेमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही त्यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

– केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी नवनवीन योजना आणणार आहे

– गर्भाशयाचा व मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून लसीकरण करण्यात येणार आहे

– गरजू व्यक्तींसाठी येत्या पाच वर्षांमध्ये दोन कोटी घरे बांधण्यात येणार आहेत

– येत्या काळामध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येणार असून यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे

– देशामधील आशा सेविकांना आयुष्मान योजनेचा लाभ दिला जाणार

– आपल्या देशाला विकसित बनवण्यासाठी शेतकरी,गरीब, महिला, तरुण अशा चार वास्तविक जातींवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे 

– दुग्धव्यवसाया संबंधित शेतकऱ्यांनाही मदत केली जाणार असून राष्ट्रीय गोकुळ मिशनसारख्या योजना सुद्धा राबवल्या जाणार.

–  पायाभूत सोयीसुविधांसाठी आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ११.११ लाख कोटींच्या तरतुदीचं नियोजन केले जाणार

– सरकारकडून एक कोटी घरांना रूफ टॉप सोलर पॅनल च्या माध्यमातून दर महिन्याला तीनशे युनिट वीज मोफत दिली जाणार

– भुईमुगाची शेती, मोहरीची शेती आणि मत्स्य योजनेला प्रोत्साहन

– मॉडेल स्टोरेज आणि सप्लाय चैन वर कृषी क्षेत्रासाठी सरकार लक्ष केंद्रित करणार

– उडान योजनेच्या अंतर्गत 517 नव्या मार्गांवर छोट्या शहरांना जोडण्यासाठी काम होणार होणार

– सर्वांना घर ,पाणी आणि वीज यावर अधिक लक्ष केंद्रित करणार

– पायाभूत सुविधांवर भर 

– उत्पादकता सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर

   अशा रीतीने अर्थसंकल्प 2024 ( Budget 2024) मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विविध घोषणा केल्या.

कमी गुंतवणुकीमध्ये आणि घरून सुद्धा सुरू करता येणारा व्यवसाय..
⭕ जाणून घ्या अधिक माहिती..
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://iconikmarathi.com/pickle-making-business/

⭕ Agriculture related business ideas 

⭕ शेती निगडित व्यवसाय..

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

Leave a Comment