लखपती दीदी योजना | Lakhpati Didi Yojana – 

     राज्य सरकार तर्फे तसेच केंद्र सरकारतर्फे जनतेच्या हितासाठी वेगवेगळ्या उद्देशाने विविध योजना राबवल्या जात असतात त्यामध्ये महिलांसाठी सुद्धा विविध योजना राबवल्या जातात. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना लखपती दीदी योजनेचा उल्लेख केला आणि आतापर्यंत एक कोटी महिलांना याचा लाभ मिळाला असून 2025 पर्यंत तीन कोटी महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवायचा आहे अशी घोषणा केली.लखपती दीदी योजना ( Lakhpati Didi Yojana ) बद्दल अधिक माहिती या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत… 

Lakhpati Didi Yojana

– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लखपती दीदी योजनेची घोषणा केली.

– ही योजना काही राज्यांमध्ये आधीपासूनच अस्तित्वात होती, परंतु आता केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त महिलांना लखपती बनवण्यासाठी लखपती दीदी योजना सुरू करण्यात आली आहे.

– गाव असो वा शहर अंगणवाडी पासून ते बँकेपर्यंत विविध क्षेत्रांमध्ये महिला काम करताना दिसून येतात आणि या महिलांना संबोधित करत असताना पंतप्रधान म्हणाले की, गावांमधील विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिला, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका यांना दीदी या नावाने संबोधले जाते, अशा महिलांना लखपती बनवण्याची योजना म्हणजेच लखपती दीदी योजना.

– लखपती दीदी योजनेचा उद्देश बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महिलांना वेगवेगळ्या कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन, त्यांना स्वावलंबी व आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवून लखपती करणे हा आहे.

– प्रशिक्षणामध्ये विविध गोष्टींचे प्रशिक्षण महिलांना देण्यात येईल उदाहरणार्थ, ड्रोन चालवणे, विविध यंत्रांची दुरुस्ती, एलईडी बल्ब निर्मिती आणि इतरही अनेक..

– लखपती दीदी योजनेमुळे महिला तर स्वावलंबी होतीलच त्यासोबतच कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यामध्ये सुद्धा मदत होईल.

– लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना विविध क्षेत्रांमधील प्रशिक्षण दिले जाईल आणि यामुळे आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यामध्ये महिलांना मदत होईल त्याचबरोबर लघुउद्योग करण्यासाठी सुद्धा महिलांना आवश्यक मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाईल.

– आर्थिक साक्षरता वर्कशॉप (Finanacial Literacy Workshop)

– सेव्हिंग इन्सेंटिव्ह (Saving Incentives)

– मायक्रोक्रेडिट सुविधा (MicroCredit Benefits)

– स्किल डेव्हलपमेंट आणि वोकेशनल ट्रेनिंग (Skill development And Vocational Trainimg)

– व्यावसायिक प्रशिक्षण (Entrepreneurship Support)

– विमा संरक्षण (Insurance coverage )

– डिजिटल आर्थिक समावेशन ( Digital Financial Inclusion )

– सक्षमीकरण आणि आत्मविश्वास निर्माण करणे ( Empowerment and confidence building)

– अर्जदार व्यक्ती महिला असणे आवश्यक आहे.

– या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी बचत गटाचे सदस्य असणे आवश्यक आहे.

– अर्जदार महिलेचे वार्षिक उत्पन्न कमी असणे गरजेचे आहे.

– लखपती दीदी योजनेमध्ये सहभागी झाल्यानंतर प्रशिक्षण घेण्याची अर्जदाराची तयारी असावी.

– अर्जदार महिला भारताची रहिवासी असणे गरजेचे आहे.

– पासपोर्ट साईज फोटो

– आधारकार्ड

– रहिवासी पुरावा

– पॅनकार्ड 

– बँक पासबुक 

– शैक्षणिक कागदपत्रे

– मोबाईल क्रमांक

– उत्पन्नाचा दाखला

लखपती दीदी योजनेसाठी ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो परंतु ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अद्याप अधिकृत वेबसाईट किंवा अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही.

– ऑफलाइन अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला ब्लॉक किंवा महिला आणि बाल विकास कार्यालयामध्ये जावे लागेल.

 – त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याशी संपर्क साधून लखपती दीदी योजनेचा अर्ज दिला जाईल.

– हा अर्ज काळजीपूर्वक भरून आवश्यक कागदपत्रे त्यासोबत जोडावी आणि अर्ज जमा करावा त्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यात येईल.

Agriculture related business ideas
⭕ शेती निगडित व्यवसाय..

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://iconikmarathi.com/agriculture-related-business-ideas/#google_vignette