१०० % अनुदानावर मिळणार झेरॉक्स शिलाई मशीन | झेरॉक्स मशीन आणि शिलाई मशीन साठी अर्ज करणे सुरू…| Xerox Shilai Machine Application
सध्याची बेरोजगारीची वाढती संख्या लक्षात घेता तसेच शिक्षण असून सुद्धा नोकरीची कमतरता यांसारख्या गोष्टी लक्षात घेऊन सरकारतर्फे विविध योजना राबवल्या जात असतात. जिल्हा परिषद योजना 2024 अंतर्गत झेरॉक्स मशीन आणि शिलाई मशीन साठी 100% अनुदान मिळणार आहे आणि त्यासाठी अर्ज करणे सुद्धा सुरू झाले आहे. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत ही योजना राबविण्यात येते. विविध योजना समाज कल्याण विभागाच्या वतीने सुरू असतात, झेरॉक्स व शिलाई मशीन योजना सुद्धा या विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे.Xerox Shilai Machine Application याबद्दलच अधिक माहिती आपण जाणून घेऊया…
Table of Contents
झेरॉक्स मशीन आणि शिलाई मशीन साठी अर्ज करणे सुरू…| Xerox Shilai Machine Application
झेरॉक्स शिलाई मशीन साठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : ३१ मार्च २०२४
झेरॉक्स शिलाई मशीन साठी अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे | documents are required for xerox silai machine application –
– आधार कार्ड
– रहिवासी दाखला
– शाळा सोडल्याचा दाखला
– जातीचा दाखला
– दिव्यांग प्रमाणपत्र
– पॅन कार्ड
– ग्रामसभेचा ठराव
झेरॉक्स शिलाई मशीनसाठी लाभार्थी पात्रता | Eligibility –
– या योजनेचा लाभ मागास प्रवर्गांमधील नागरिक येऊ शकतात परंतु ही योजना खुल्या प्रवर्गांमधील नागरिकांसाठी नाही.
– दिव्यांग व्यक्ती व मागासवर्गीय या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
– अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षा दरम्यान असावे.
– अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये पेक्षा कमी असावे.
झेरॉक्स शिलाई मशीन साठी अर्ज कुठे करावा ?
– झेरॉक्स शिलाई मशीन साठी अर्ज समाज कल्याण विभाग कार्यालयामध्ये सादर करणे आवश्यक आहे.
– यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 असून ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज सादर करावा व या योजनेअंतर्गत पात्र ठरल्यास अर्जदारास या योजनेचा लाभ घेता येईल.