राज्यांमधील या कामगारांना मिळणार दहा हजार रुपये | Sanman Dhan Yojana Maharashtra 2024 I Best Government Schemes 2024

राज्यांमधील या कामगारांना मिळणार दहा हजार रुपये | Sanman Dhan Yojana Maharashtra 2024 | सन्मान धन योजना –

        राज्यामधील नोंदणीकृत घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळा अंतर्गत सन्मान धन योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.सन्मान धन योजना (Sanman Dhan Yojana) या योजनेअंतर्गत घरेलू कामगारांना दर वर्षी दहा हजार रुपये दिले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने यासंदर्भामधील जीआर काढला आहे. घरेलू कामगारांचे जीवनमान सुधारण्यासाठी किंवा उंचावण्यासाठी सन्मान धन योजना ही एक चांगली योजना ठरू शकते.

Sanman Dhan Yojana Maharashtra 2024 | सन्मान धन योजना –

Sanman Dhan Yojana

– सन्मान धन योजने साठी वयाची 18 वर्ष पूर्ण असलेली परंतु 60 वर्षापेक्षा कमी वय असलेले घरेलू कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

– सन्मान धन योजनेअंतर्गत दरवर्षी 31 डिसेंबर रोजी 55 वर्ष पूर्ण असलेल्या महाराष्ट्र राज्यामधील घरेलू कामगार कल्याण मंडळामधील जीवित नोंदणी पात्र घरेलू कामगारांना लाभ देण्याचे शासनाच्या विचारांमध्ये होतेच, यामुळे घरेलू कामगारांचे जीवनमान सुधारण्यामध्ये मदत होऊ शकते.

– घरेलू कामगारांना १० हजार रुपये डीबीटीद्वारे मिळणार आहेत परंतु त्यासाठी काही अटी आहेत, त्या पुढीलप्रमाणे :

Sanman Dhan Yojana Maharashtra 2024 | सन्मान धन योजना अटी-

– यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे , ते या योजनेसाठी पात्र नाहीत.

– अर्थ सहाय्य लाभार्थ्यांना वितरित करण्यापूर्वी ते लाभार्थी जीवित नोंदणीकृत व पात्र आहेत अशी खात्री विकास आयुक्त (असंघटित कामगार) कार्यालयाने करणे आवश्यक आहे.

– अर्थसहाय्य तातडीने वाटप व्हावेत यासाठी कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव, महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत, उक्त आदेश निर्गमित करावेत.त्यामध्ये उक्त अधिनियमाच्या कलम १५ (३) मधील तरतूद सर्व जिल्हास्तरावरील कार्यालय प्रमुखाना देखील तंतोतंत लागू राहील, याचा उल्लेख करावा.

– सदर अर्थसहाय्याचे वाटप जलदगतीने होण्याच्या दृष्टीकोनातुन व लाभार्थ्याच्या सोयीच्या दृष्टीकोनातून कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रमुखामार्फत (अपर कामगार आयुक्त/कामगार उप आयुक्त/सहाय्यक कामगार आयुक्त/ सरकारी कामगार अधिकारी) अर्थसहाय्याचे वाटप करण्यात यावे.

– महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने या प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाचा निधी हस्तांतरीत करावा.

– वरील कार्यपध्दतीप्रमाणे आर्थिक लाभ वाटप देण्याबाबतचे राज्य व जिल्हा स्तरावरचे नियंत्रण व समन्वयन विकास आयुक्त (असंघटित कामगार) यांनी करावे.

    सन्मान धन योजनेसाठी आवश्यक पात्रता, या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तसेच सन्मान धन योजनेसाठी अर्ज कसा करावा याबद्दलची अधिक माहिती लवकरच उपलब्ध होऊ शकते.

⭕ आठवी किंवा चौदा वर्षाखालील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण..

⭕जाणून घ्या अधिक माहिती…

Leave a Comment