Post office Vima Yojana | ३९९ रुपयांमध्ये दहा लाखांपर्यंतचा विमा | Post Office Insurance Scheme I Best Insurance Schemes 2024 –

Post office Vima Yojana | ३९९ रुपयांमध्ये दहा लाखांपर्यंतचा विमा | Post Office Insurance Scheme –

        प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे आयुष्य किंवा स्वतःचा जीव हा महत्त्वाचा असतोच, असे होऊ नये परंतु जर कधी कुटुंबामधील कर्त्या व्यक्तीच्या जीवनावर अशी वेळ आली आणि अपघातामुळे किंवा इतर काही कारणामुळे जीव गमवावा लागला संपूर्ण कुटुंबाचे मानसिक नुकसान होईलच त्याचबरोबर आर्थिक नुकसान सुद्धा होईल. हल्ली बरेच लोक विमा काढतात परंतु सर्वच लोकांना महागडे विमा काढणे शक्य असेलच असे नाही म्हणूनच आज अशा एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत की ज्यामध्ये अगदी 299 किंवा 399 मध्ये विमा काढून चांगले फायदे आपल्याला मिळू शकतात. ही योजना आहे पोस्ट ऑफिस विमा योजना ( Post office Vima Yojana ) …

     पोस्ट ऑफिस विमा योजना दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे ,आपण 299 रुपये किंवा 399 भरून या योजनेचा लाभ घेऊ शकतो परंतु 299 रुपये भरून जे लाभ मिळतात ते ३९९ रुपये भरून मिळणाऱ्या लाभां पेक्षा कमी प्रमाणामध्ये आहे.

Post office Vima Yojana | ३९९ रुपयांमध्ये दहा लाखांपर्यंतचा विमा | Post Office Insurance Scheme –

 Post Office Vima Yojana

पोस्ट ऑफिस विमा योजनेचे फायदे | Benefits of Post Office Vima Yojana –

– व्यक्तीस अपघाती मृत्यू आल्यास १० लाख रुपये

– अपघातामुळे कायमस्वरूपीचे अपंगत्व आल्यास १० लाख रुपयांचे संरक्षण

– दवाखान्याचा खर्च ६० हजार रुपये

– मुलाच्या शिक्षणासाठी- १ लाख रुपये प्रति मुल (जास्तीत जास्त दोन मुलांपर्यंत )

– जोपर्यंत ऍडमीट असू तोपर्यंत रोज १ हजार रुपये (१० दिवसापर्यंत)

– ओ पी डी ( OPD ) खर्च -३० हजार रुपये

– जर अपघाताने पॅरॅलिसिस झाला तर – १० लाख रुपये

– कुटुंबाला दवाखाना प्रवासखर्च २५,०००/- कृपयांपर्यंत.

जर आपण 399 ऐवजी 299 रुपये भरले तर कोणते लाभ मिळणार नाहीत – 

– 399 रुपयांच्या पोस्ट ऑफिस विमा योजनेमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी प्रत्येकी जो एक लाख रुपये खर्च दिला जातो तो 299 रुपये भरून मिळणार नाही.

– तसेच 399 रुपयांच्या पोस्ट ऑफिस विमा योजनेत दवाखान्यामध्ये ऍडमिट असल्यानंतर प्रति दिवस मिळणारा एक हजार रुपये खर्च 299 रुपये भरून मिळणार नाही.

– तसेच 399 रुपयांच्या पोस्ट ऑफिस विमा योजनेमध्ये कुटुंबाला दवाखान्याचा वाहतूक प्रवास खर्च दिला जातो तो 299 भरून मिळणार नाही.

– 399 रुपयांच्या पोस्ट ऑफिस विमा योजनेमध्ये विमाधारकाच्या अंत्यसंस्कारासाठी पाच हजार रुपयांपर्यंत खर्च दिला जातो तो 299 रुपयांच्या पोस्ट ऑफिस योजनेमध्ये दिला जाणार नाही.

पोस्ट ऑफिस विमा योजनेसाठी आवश्यक पात्रता | Eligibility for Post office Insurance –

– पोस्ट ऑफिस विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये बँक खाते असणे आवश्यक आहे. 

– पोस्ट ऑफिस विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा 18 वर्ष ते 65 वर्ष असणे आवश्यक आहे. 

– पोस्ट ऑफिस विमा योजनेसाठी दरवर्षी 399 किंवा 299 भरावे लागणार आहेत. 399 रुपये भरून अधिक लाभ मिळतात त्यामुळे ३९९ रुपये भरणे अधिक योग्य असेल.

पोस्ट ऑफिस विमा योजनेचा कालावधी | Duration of Post Office Insurance Scheme –

– पोस्ट ऑफिस विमा योजनेचा कालावधी एक वर्ष असणार आहे म्हणजेच Policy Tenure – १ वर्ष आहे.

– विमाधारक व्यक्तीने एक वर्ष झाल्यानंतर पोस्ट ऑफिस मध्ये विम्याचे नूतनीकरण करणे आवश्यक असेल.

पोस्ट ऑफिस विमा योजनेसाठी अर्ज | Post Office Vima Yojana Application –

– पोस्ट ऑफिस विमा योजनेबद्दल अधिक माहिती आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये मिळेल. 

– पोस्ट ऑफिस विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये बँक खाते असणे आवश्यक आहे जर आधीपासूनच आपले बँक खाते असेल तर उत्तमच परंतु तसे नसेल तर बँक खाते उघडावे लागेल. 

– पोस्ट ऑफिस मधून एक कार्ड मिळते त्या कार्डचा उपयोग विम्याचा लाभ मिळवण्यासाठी होतो.

     अशाप्रकारे पोस्ट ऑफिस विमा योजना ही सर्वांसाठीच खूप महत्त्वाची योजना असून बरेचसे लाभ या योजनेमुळे विमाधारकास मिळणार आहेत. 299 किंवा 399 रुपये ही रक्कम सध्याच्या जगामध्ये सहज मोबाईल रिचार्ज करण्यासाठी किंवा टीव्ही चा रिचार्ज करण्यासाठी किंवा हॉटेलमध्ये जाऊन जेवण्यासाठी अशा इतर गोष्टींसाठी सहज खर्च केली जाते परंतु जर दर दरवर्षी एवढी रक्कम भरून आपल्याला चांगले विमा संरक्षण मिळणार असेल तर पोस्ट ऑफिस विमा योजनेमध्ये नक्कीच भाग घेतला पाहिजे.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज कराhttps://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठीhttps://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment