२०२४ मध्ये आर्थिक बचत कशी कराल | Financial Tips in Marathi| Best finance tips | Money Saving tips –

२०२४ मध्ये आर्थिक बचत कशी कराल | Financial Tips in Marathi| Best finance tips | Money Saving tips 
    सध्या आणि भविष्य काळामध्ये सुद्धा आपल्याकडे पुरेसे पैसे असणे म्हणजेच आपण आर्थिक दृष्ट्या सुरक्षित असणे खूप गरजेचे आहे. आर्थिक दृष्ट्या सुरक्षित राहण्यासाठी बरेच लोक वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात तसेच विविध प्रकारचे विमा सुद्धा काढतात. आर्थिक व्यवस्थापन करण्यासाठी आजच्या लेखामध्ये आपण सहा सोप्या टिप्स बघणार आहोत.

Best Financial tips | आर्थिक बचत कशी कराल ?

Finance tips

1.  सहा महिने जेवढा खर्च येतो तेवढ्या पैशाचा एक इमर्जन्सी फंड बनवा | emergency fund –

आपला महिन्याचा जो काही खर्च असतो उदाहरणार्थ किराणा ,भाजीपाला, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घर किंवा गाडीचे हप्ते किंवा इतर खर्च या सर्व खर्चांचा हिशोब करून सहा महिने किती खर्च येऊ शकतो हा अंदाज घेऊन तेवढ्या अमाऊंटचा इमर्जन्सी फंड बनवला पाहिजे असे केल्यामुळे आपण करत असलेल्या नोकरी किंवा व्यवसायामध्ये अचानकपणे काही अडचण आली तर इतर नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी आपल्याला किमान सहा महिन्यांचा कालावधी तरी मिळेल आणि आपण अशा रीतीने आर्थिक दृष्ट्या सुरक्षित होऊ.
 

2. आपल्या दर महिन्याच्या कमाई मधून कमीत कमी 20 टक्के रक्कम सेव करा | Monthly saving –

    आपली महिन्याला जी काही कमाई असेल त्या कमाई मधून कमीत कमी 20 टक्के रक्कम आपण बचत केली पाहिजे. या बचत केलेल्या रकमेचा उपयोग भविष्यामध्ये आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यामध्ये नक्की होईल.

3.  अधिक इन्कम सोर्स बनवा | Income source –

    बरेच लोक एकाच इनकम सोर्स वर अवलंबून राहता परंतु काही अडचण किंवा अचानकपणे इतर काही प्रॉब्लेम आला तर अशावेळी मात्र आपल्या उत्पन्नाचा स्रोत आपल्याकडे नसेल तर आपल्यापुढे फार मोठा प्रश्न उभा राहतो आणि म्हणूनच आपण नोकरी करत असो वा व्यवसाय परंतु एका व्यतिरिक्त आपल्याकडे जास्तीत जास्त इन्कम सोर्स असावेत.
    उदाहरण म्हणून सांगायचे झाले तर कोरोना काळामध्ये बहुतेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या परंतु जे लोक पूर्णपणे नोकरीवर अवलंबून होते त्यांना आर्थिक सपोर्ट नव्हता परंतु ज्या लोकांना शेती होती किंवा जे लोक नोकरी बरोबरच इतर छोटासा व्यवसाय करत होते किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्निंग करत होते अशा लोकांना कोरोनाचा फारसा फटका बसला नाही.
   म्हणूनच आपण सुद्धा कमाईचे जास्तीत जास्त स्रोत निर्माण करणे गरजेचे आहे.

4 . फायनान्स संदर्भात ज्ञान मिळवा | Finance knowledge – 

    आर्थिक बचत करावी हे प्रत्येकालाच वाटते परंतु आर्थिक बचत नेमकी कशी करावी याबद्दल व्यवस्थित रित्या ज्ञान मिळत नाही परंतु जर आपण फायनान्स संदर्भामध्ये पुस्तके वाचली तर आपल्याला नक्कीच त्याबद्दल पुरेसे ज्ञान मिळू शकते. पुस्तके वाचण्याबरोबरच इंटरनेटच्या माध्यमातून सुद्धा विविध प्लॅटफॉर्मवर फायनान्स संदर्भात ज्ञान आपल्याला नक्कीच मिळू शकते.

5 . जर गरज नसेल तर कर्ज घेऊ नका –

काही लोकांना सवय असते की जी गोष्ट अति गरजेची नाही ती सुद्धा खरेदी करतात परंतु ती वस्तू खरेदी करताना आपल्या आर्थिक बजेट विचारात घेत नाहीत आणि नंतर त्या वस्तूची किंमत चुकवण्यासाठी कर्ज घेण्याची वेळ येते
मग हे कर्ज भरत असताना जर अडचणी येऊ लागल्या तर मात्र प्रॉब्लेम होतो. परंतु ज्या वस्तू किंवा गोष्टी आपल्या गरजेच्या नसतील आणि जर त्या वस्तू महागड्या असतील तर नक्कीच अशा वस्तू घेणे टाळावे.

6 . जोपर्यंत संपत्ती तयार होत नाही तोपर्यंत आपल्या  हौसेच्या वस्तू खरेदी करू नका – 

काही लोक ज्या वस्तू गरजेच्या नाहीत त्या वस्तू हौस म्हणून खरेदी करतात परंतु आपण जर आर्थिक दृष्ट्या सक्षम नसू तर असे करणे टाळावे.हौस पूर्ण करणे किंवा आपल्या आवडीच्या वस्तू घेणे यामध्ये काही गैर नाही परंतु त्यासाठी आपण सर्वप्रथम आर्थिक दृष्ट्या मजबूत होणे गरजेचे आहे.
     अशाप्रकारे या फायनान्स टिप्स नक्कीच आपल्या उपयोगात येणाऱ्या आहेत आणि पैशांमध्ये बचत करण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहेत.

Leave a Comment