The story of India’s fevicol man: Balwant Parekh (बलवंत पारेख)

आज आपण बघणार आहोत बलवंत पारेख म्हणजेच भारताचे फेविकॉल मॅन यांची यशोगाथा. बलवंतराय कल्याणजी पारेख असे बलवंत पारेख यांचे संपूर्ण नाव. गुजरात मध्ये महुआ येथे 1925 मध्ये बलवंतराय पारेख यांचा जन्म झाला. त्यांनी मुंबई येथे वकिलीचे शिक्षण पूर्ण केले असले तरीसुद्धा वकिली करण्यामध्ये त्यांना फारसा रस नव्हता.

शिपाई पासून ते भारताचा फेविकॉल मॅन पर्यंतचा प्रवास : बलवंत पारेख

      बलवंत पारेख यांनी त्यांच्या आयुष्यामधील काही काळ प्रिंटिंग प्रेस मध्ये काम केलेले आहे त्याचबरोबर त्यांनी शिपायाची नोकरी एका लाकूड व्यापाऱ्याकडे केली. त्यांच्या पत्नीचे नाव कांता बेन. दोघा पती-पत्नींनी मिळून गोदामा मध्ये सुद्धा कामे केलेली आहेत.
    बलवंत पारेख यांना नेहमीच नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड. त्यांचे संपर्क सुद्धा खूप चांगले होते आणि म्हणूनच पारेख साहेबांना जर्मनीला जाण्याची एक चांगली संधी मिळाली. बलवंत पारेख यांनी जर्मनीला गेल्यानंतर या संधीचे सोने केले आणि भरपूर ज्ञान तेथून संपादन केले.
Fevicol Man : Balwant Parekh ( बलवंत पारेख )
     आपल्या ज्ञानाचा उपयोग करून भारतामध्ये काहीतरी सुरू करावे असे ते जेव्हा भारतामध्ये परत आले त्यावेळी त्यांनी ठरवले. भावासोबत त्यांनी डाय आणि केमिकलची फॅक्टरी सुरू केली. बलवंत पारेख यांनी खूप संशोधन केल्यानंतर डिंक (adhesive) बनवण्याचे ठरवले. आणि तसे केले सुद्धा… आणि तेव्हाच “फेविकॉल”चा जन्म झाला असे आपण म्हणू शकतो.
   आता फेविकॉलच नाव का तर… जर्मन मध्ये त्यावेळी “मोविकॉल” नावाचा प्रॉडक्ट होता आणि त्यावरूनच “फेविकॉल” नाव त्यांनी बनवलेल्या डिंकाला देण्यात आले. त्याचबरोबर कॉल हा जर्मन शब्द असून त्याचा अर्थ डिंक असा होतो.
     अगदी आपण लहान असल्यापासूनच फेविकॉल बघत आलेलो आहोत.
    बलवंत पारेख यांनी पिडीलाईट या कंपनीची स्थापना 1959 मध्ये केली तर कोंडीविटा येथे 1963 मध्ये फेविकॉल तयार करण्याचा कारखाना सुरू करण्यात आला. नंतर 1970 मध्ये फेविकॉल हा निळा व पांढऱ्या रंगाच्या ट्यूब मध्ये लॉन्च करण्यात आला त्या ट्यूब मध्ये तीस ग्रॅम इतका फेविकॉल बसत असे.
    ज्यावेळी फेविकॉल निर्मितीची सुरुवात होती त्यावेळी फेविकॉल दुकानदारांमार्फत विक्री होत नव्हता थेट कारपेंटर सोबत संपर्क साधून त्यांना विक्री करण्यात आला. म्हणूनच कार्पेंटर साठी फेविकॉल खूप विश्वसनीय असा प्रॉडक्ट तेव्हापासून ठरला. परंतु फेविकॉल हा फक्त कारपेंटर साठी उपयोगात राहिलेला नसून घरोघरी विविध कारणांसाठी तसेच शालेय विद्यार्थी सुद्धा फेविकॉलचा वापर विविध प्रोजेक्ट्स बनवण्यासाठी किंवा इतर काही बनवण्यासाठी करतात.
    फेविकॉलला हळूहळू प्रसिद्धी मिळत गेली आणि आता तर फेविकॉल घराघरात माहिती आहे. फेविकॉलनंतर पिडीलाईट या कंपनीने एमसिल सारखी कित्येक उत्पादने मार्केटमध्ये आणली.
     बलवंत पारेख आणि धीरूभाई अंबानी हे सुद्धा एकमेकांचे चांगले मित्र. बलवंत पारेख यांना कल्पना नावाची एक मुलगी तर मधुकर आणि अजय असे दोन मुले.
       2011 मध्ये बलवंत पारेख यांना जे. टॅलबोट विंचेल पुरस्कार मिळाला तर बलवंत पारेख यांना फोर्ब्स इंडियाने त्यांच्या वार्षिक श्रीमंतांच्या यादीत (annual rich list rankings) 45 वे स्थान दिले होते.
       2009 मध्ये बडोदा, गुजरात या ठिकाणी बलवंत पारेख यांनी सेंटर फॉर जनरल सिमेंटिक्स अँड अदर ह्युमन सायन्सेसची स्थापना केली.
      गुजरात मधील भावनगरच्या सायन्स सिटी प्रोजेक्टसाठी बलवंत पारेख यांनी वीस दशलक्ष रुपये देणगी दिली त्याच बरोबर गुजराती साहित्य परिषदेला ही त्यांनी देणगी दिली.
     विनाइल केमिकल्स इंडियाचे अध्यक्ष आणि पिडीलाइट इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष म्हणून बलवंत पारेख यांनी काम केले. बलवंत पारेख हे एक मोठे उद्योगपती होते, परंतु उद्योगपती बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खूप प्रेरणादायी ठरला.
  भारताच्या फेविकॉल मॅनचा म्हणजेच बलवंतराय पारेख यांचा मृत्यू 25 जानेवारी 2013 या दिवशी मुंबई येथे वयाच्या 88 व्या वर्षी झाला.

हे ही वाचू शकता…

2024 पासून आर्थिक बचत योग्यरीत्या करायची असेल तर ह्या टीप्स नक्की उपयोगी येतील.

Leave a Comment