उन्हाळ्यामध्ये सुरू करता येतील असे व्यवसाय | Summer Business ideas| business ideas for summer | best business idea 2024 –

         असे बरेच व्यवसाय आहेत की जे सर्व ऋतूंमध्ये चालू शकतात परंतु काही व्यवसाय असे सुद्धा आहेत की जे ठराविक ऋतूमध्ये चालतात. परंतु ज्या त्या व्यवसायाला त्या ठराविक ऋतूमध्ये प्रचंड मागणी असते आणि म्हणूनच आज आपण उन्हाळ्यामध्ये सुरू करता येतील असे व्यवसाय ( business ideas for summer ) जाणून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूयात…

Business ideas for summer | उन्हाळ्यामध्ये सुरू करता येतील असे व्यवसाय | Summer Business ideas –

Business ideas for summer

Business ideas for summer –

. उसाचा रस विक्री व्यवसाय –

– उन्हाळा सुरू झाला की सर्वांनाच थंड पेय प्यावेत असे वाटते परंतु काही थंडपेय आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे आणि म्हणूनच बरेच लोक उसाचा रस पिणे पसंत करतात.

– उसाचा रस हा उन्हाळ्यामध्ये लोक आवर्जून पितातच त्यामुळे या व्यवसायाला उन्हाळ्यामध्ये प्रचंड मागणी असते.

– उसाचा रस विक्री व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यकता आहे उसाच्या रसाची मशीन, ऊस, ग्लासेस, टेबल खुर्ची व इतर आवश्यक सामग्री.

– उसाचा रस सुद्धा काही लोक विविध फ्लेवर मध्ये म्हणजे अद्रक ,लिंबू यांसारख्या सामग्रीचा उपयोग करून विकतात, त्यामुळे नक्कीच रसाची चव अधिक वाढते.

– थेट शेतकऱ्यांकडून सुद्धा उसाची खरेदी करता येऊ शकते किंवा होलसेल दरामध्ये ऊस खरेदी करू शकता.

– चांगल्या प्रतीचा ऊस असेल तर उसाचा रस सुद्धा चांगला निघतो ,त्यामुळे चांगल्या प्रतीचा ऊस खरेदी करावा.

– उसाच्या रसाच्या ग्लासची किंमत साधारणतः दहा ते वीस रुपयांच्या आसपास असते परंतु तरीसुद्धा आपण ज्या परिसरामध्ये हा व्यवसाय सुरू करणार आहोत त्या परिसरानुसार उसाच्या रसाचा दर ठरवला पाहिजे.

२ . लोणची पापड व्यवसाय –

– उन्हाळा सुरू झाला की आपल्या महाराष्ट्रामध्ये तर आवर्जून लोणचे, पापड ,कुरडया, वेफर्स केले जातात.

– काही महिला हे सर्व स्वतःच घरी बनवतात तर काही महिला बाहेरून बनवून घेतात.

– ज्या महिला बाहेरून बनवून घेतात त्या महिलाच आपले टार्गेट कस्टमर या व्यवसायासाठी असणार आहेत.

– आपण वेगवेगळ्या चवीची लोणची उदाहरणार्थ, कैरीचे लोणचे, लिंबूचे लोणचे, मिरचीचे लोणचे, गाजराचे लोणचे किंवा इतर अनेक लोणच्याचे प्रकार उपलब्ध आहेत ते बनवून देऊ शकतो आणि त्यांची विक्री करू शकतो. आता या ठिकाणी दोन प्रकारे व्यवसाय करता येईल, एका प्रकारामध्ये ग्राहकाची ज्याप्रमाणे ऑर्डर असेल त्याप्रमाणे आपण त्यांना हवे असलेले लोणचे बनवून देऊ शकतो आणि दुसऱ्या प्रकारांमध्ये आपण विविध प्रकारचे लोणचे बनवून आपल्या ब्रँडने विकू शकतो.

– लोणच्याप्रमाणेच वेगवेगळ्या पापड्या तसेच वेफर्स, कुरडया सुद्धा ज्या ग्राहकांना बनवून पाहिजे आहे त्यांना आपण बनवून देऊ शकतो. तसेच हे सर्व आपण बनवून याचा व्यवसाय करू शकतो तो कसा तर बनवलेले वेफर्स, कुरडया किंवा पापड्या आकर्षक अशा पॅकिंग मध्ये पॅक करून विक्री करू शकतो.

– या व्यवसायाची मार्केटिंग सोशल मीडिया मार्केटिंग पद्धतीने करू शकतो तसेच आपल्या उत्पादनाची चव जर ग्राहकांना आवडली तर ग्राहकामार्फत सुद्धा इतर ग्राहकांना सांगितले जाते आणि आपले चांगले ग्राहक तयार होतात.

– तसेच ही उत्पादने किराणा दुकान किंवा सुपर मार्केट या ठिकाणी सुद्धा आपण विक्रीसाठी देऊ शकतो.

३ . आईस्क्रीम व्यवसाय –

– आईस्क्रीम व्यवसाय हा सुद्धा उन्हाळ्यामध्ये हमखास चालतो.

– आईस्क्रीम व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपण एखाद्या ब्रँडची फ्रेंचाईजी घेऊ शकतो ज्यामुळे लोकांना त्या ब्रँड बद्दल आधीपासूनच माहिती असते आणि त्या ब्रँड बद्दल विश्वास असल्याकारणाने ग्राहक सुद्धा आपल्याला पटकन मिळतात.

– जर आपल्याला आईस्क्रीमच्या ब्रँडची फ्रेंचाईजी घ्यायची नसेल तर आपल्याला स्वतः आईस्क्रीम बनवता येत असतील तर होममेड आईस्क्रीम सुद्धा बनवून त्याची विक्री करता येऊ शकते.

– आपण स्वतः जर आईस्क्रीम बनवण्यामध्ये तरबेज असू तर आईस्क्रीम बनवण्याचे क्लासेस सुद्धा हल्ली घेतले जातात ते सुद्धा आपण घेऊ शकतो.

– आईस्क्रीम प्रिमिक्स सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध असते ते जर आपल्याला बनवता आले तर त्याचा सुद्धा व्यवसाय आपण नक्कीच करू शकतो.

     अशाप्रकारे हे काही व्यवसाय ( Business ideas for summer) आहेत की जे उन्हाळ्यामध्ये सुरू केले जाऊ शकतात परंतु हे व्यवसाय फक्त उन्हाळ्या पुरतेच मर्यादित नसून इतर ऋतूंमध्ये सुद्धा या व्यवसायांना मागणी असते परंतु फरक फक्त एवढाच की उन्हाळ्यामध्ये या व्यवसायांना जास्त मागणी असते.

⭕ तुम्ही एकटेही सुरू करू शकता असा व्यवसाय…

⭕ जाणून घ्या अधिक माहिती…

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://iconikmarathi.com/graphic-design-business/