SBI ग्राहक सेवा केंद्र कसे सुरु करावे | SBI customer service point (CSP) | SBI Grahak Seva Kendra  –

    बरेचसे लोक उच्चशिक्षित असतात परंतु नोकरीचा अभाव किंवा इतर काही कारणास्तव करिअर नेमकं कोणत्या क्षेत्रामध्ये करावं हा प्रश्न असतो,काही लोक व्यवसायाकडे वळतात तर काही लोक नोकरीकडे.. ज्यांना स्वतःचे काहीतरी सुरू करायचे आहे त्यांच्यासाठी एसबीआय ग्राहक सेवा केंद्र हा एक चांगला ऑप्शन ठरू शकतो.SBI ग्राहक सेवा केंद्र ( SBI Grahak Seva Kendra ) कसे सुरु करावे याबद्दलच अधिक माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत…

SBI Grahak Seva Kendra | SBI ग्राहक सेवा केंद्र –

SBI Grahak seva Kendra

– एसबीआय ग्राहक सेवा केंद्राला ” एसबीआय मिनी बँक ” या नावाने सुद्धा ओळखले जाते.

– एसबीआय ग्राहक सेवा केंद्र म्हणजे असे ठिकाण ज्या ठिकाणी बँकेमार्फत ग्राहकांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधा म्हणजेच नवीन बँक खाते उघडणे, बँक खात्यामध्ये पैसे जमा करणे किंवा पैसे काढणे अशा सुविधा बँकेमध्ये न जाता एसबीआय ग्राहक सेवा केंद्र मार्फत पूर्ण केल्या जाऊ शकतात.

– ग्रामीण भागामध्ये किंवा इतर बऱ्याच ठिकाणी आपल्या घरापासून बँकेची शाखा दूर असल्याकारणाने बँकेमध्ये जर काही काम असेल तर इतक्या लांब जाणे येणे करावे लागते तसेच एका वेळी जर ते काम झाले नाही तर कित्येक फेऱ्या बँकेमध्ये माराव्या लागतात अशा काही अडचणी दूर करण्यासाठी एसबीआय ग्राहक सेवा केंद्र हा एक सुलभ मार्ग आहे.

Services provided by SBI Grahak Seva Kendra | SBI ग्राहक सेवा केंद्रामार्फत मिळणाऱ्या सुविधा  –

एसबीआय ग्राहक सेवा केंद्रमार्फत पुरवल्या जाणाऱ्या सुविधा पुढीलप्रमाणे आहेत :

– नवीन बँक खाते उघडणे

– बँक खात्यासोबत आधार कार्ड आणि पॅन कार्डची नोंदणी करणे

– ग्राहकाच्या बँक खात्यात पैसे जमा करणे (कॅश डिपॉझिट) 

– ग्राहकाच्या बँक खात्यातून पैसे काढण्याची सुविधा (कॅश विड्रॉल )

– बँक पासबुक छापणे 

– नवीन एटीएम कार्डसाठी अर्ज करणे 

– विमा उतरवणे 

– आरडी आणि एफडी खाते उघडणे

– मनी ट्रान्सफर इत्यादी.

एसबीआय ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यासाठी लागणारे आवश्यक उपकरणे | Necessary equipment required to start SBI Customer Service Center –

एसबीआय ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यासाठी नक्कीच काही उपकरणांची आवश्यकता लागते, ती उपकरणे पुढील प्रमाणे :

– लॅपटॉप किंवा कम्प्युटर

– इंटरनेट कनेक्शन

– प्रिंटर आणि स्कॅनर

– फिंगरप्रिंट डिवाइस

– दीडशे ते दोनशे स्क्वेअर फिट जागा/शॉप

– लॉक अप

एसबीआय ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यासाठी लागणारी आवश्यक पात्रता | eligibility criteria for starting SBI Grahak seva Kendra –

एसबीआय ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक पात्रता पुढील प्रमाणे आहे :

– अर्जदार 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

– अर्जदाराने कधीही SBI बँकेकडून कर्ज घेतले असेल तर ते थकबाकीदार नसावे. 

– अर्जदाराचा कोणत्याही प्रकारचा गुन्हेगारी रेकॉर्ड नसावा. 

– अर्जदारास कम्प्युटर चालविण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.

एसबीआय ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे | documents required for starting SBI Grahak seva Kendra – 

– अर्जदाराचे 2 पासपोर्ट साइज फोटो

– आधार कार्ड

– पॅन कार्ड

– पोलीस वेरिफिकेशन प्रमाणपत्र

– दुकानाच्या भाडेपट्टीचा किंवा मालकीचा पुरावा ( lease or ownership document )

एसबीआय ग्राहक सेवा केंद्र कसे सुरु करावे | how to open SBI Grahak seva Kendra –

– जर तुम्हाला एसबीआय ग्राहक सेवा केंद्र आपल्या परिसरामध्ये सुरू करायचे असेल तर तेथील एसबीआय बँकेमध्ये जाऊन त्या बँकेमधील मॅनेजरशी संपर्क साधावा.

– बँकेमधील मॅनेजर सोबत एसबीआय ग्राहक सेवा केंद्र आपल्याला सुरू करायचे आहे याबद्दल सविस्तर चर्चा करावी तसेच मॅनेजर कडून सुद्धा या केंद्रासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते याबाबतची संपूर्ण माहिती मिळवावी.

– बँक मॅनेजर मार्फत आपल्याला एसबीआय ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यासाठी सर्व माहिती मिळेल व आपल्या आसपासच्या परिसरामध्ये जर एसबीआय ग्राहक सेवा केंद्र यापूर्वी सुरू केलेले नसेल तर नक्कीच आपल्याला एसबीआय ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यासाठी आयडी मिळू शकतो.

how to open sbi grahak kendra Online –
Partner website

1.- Link

2. Link

3. Link

या वेबसाईट वरून संपूर्ण योग्य माहिती घेऊन शहानिशा करुन अप्लाय करा.

SBI ग्राहक सेवा केंद्र उघडून किती पैसे कमवू शकता? 

– एसबीआय ग्राहक सेवा केंद्र सुरू करून चांगली कमाई केली जाऊ शकते.

– एसबीआय ग्राहक सेवा केंद्रामध्ये बँकेच्या वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळे कमिशन दिले जाते.

उदाहरणार्थ, नवीन बँक खाते उघडण्यासाठी वेगळे कमिशन दिले जाते.

 ग्राहकाच्या बँक खात्यात पैसे जमा करणे आणि काढणे यासाठी वेगळे कमिशन आहे.

 ग्राहकाच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करण्यासाठी वेगळे कमिशन दिले जाते. 

एसबीआय ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यासाठी येणारा खर्च –

– एसबीआय ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यासाठी येणारा खर्च हा आपल्याकडे हे केंद्र सुरू करण्यासाठी आधीपासूनच कोणती उपकरणे किंवा कोणती साधने उपलब्ध आहे यावर अवलंबून आहे.

– उदाहरणार्थ, आपल्याकडे जर स्वतःची जागा असेल किंवा स्वतःचे शॉप असेल तर आपण जागेसाठी लागणारा खर्च या ठिकाणी वाचवू शकतो तसेच आपल्याकडे जर लॅपटॉप असेल किंवा इतर उपकरणे पहिल्यापासूनच उपलब्ध असतील तर तो खर्च सुद्धा या ठिकाणी वाचवू शकतो.

– परंतु यापैकी जर आपल्याकडे काही नसेल तर अंदाजे साधारणतः 80 हजार ते एक लाखापर्यंत खर्च येऊ शकतो. आपण कोणत्या कंपनीचे उपकरणे खरेदी करत आहोत यानुसार हा खर्च कमी किंवा जास्त प्रमाणात येऊ शकतो.

⭕ Cashless everywhere

⭕ हॉस्पिटल्स मध्ये मिळणार कॅशलेस सुविधा…

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://iconikmarathi.com/cashless-everywhere/