Money Saving tips | आर्थिक बचत करण्यासाठी काही टिप्स | दर महिन्याला आपल्या सॅलरीमधून पैशाची बचत कशी करावी | Best tips 2024 –

Money Saving tips | आर्थिक बचत करण्यासाठी काही टिप्स | दर महिन्याला आपल्या सॅलरीमधून पैशाची बचत कशी करावी | Best tips –

    आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पैशाला खूप महत्त्व आहे कारण आपल्या मूलभूत गरजा तसेच इतर आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी पैशांची आवश्यकता असते. प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळा पगार असतो किंवा वेगवेगळे उत्पन्न मिळत असते परंतु असे असले तरी आर्थिक बचत करणे खूप महत्त्वाचे आहे. ज्या व्यक्तीला थोडासा कमी पगार असतो त्या व्यक्तीला आर्थिक बचत नेमकी कशी करावी याबद्दल बरेच प्रश्न असतात किंवा इतर व्यक्तींना सुद्धा आर्थिक बचत कशी करावी यासाठी मार्ग सापडत नाही. म्हणूनच आजच्या ब्लॉगमध्ये आपण आर्थिक बचत करण्यासाठी काही टिप्स ( Money Saving tips ) बघणार आहोत.

Money Saving tips | आर्थिक बचत करण्यासाठी काही टिप्स –

 

Money Saving tips

1. 50-30-20 नियम:

 • प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये जितकी आर्थिक बचत करता येईल तितकी करणे आवश्यक आहे. आर्थिक बचत करण्यासाठी 50-30-20 हा नियम वापरू शकता. 
 • उत्पन्नातील 50% भाग : आपल्या उत्पन्नामध्ये 50 टक्के इतका भाग भाडे, किराणा सामान, औषधे, कपडे, वाहतुक यांसारख्या अत्यावश्यक असणाऱ्या गरजांसाठी वापरला जाऊ शकतो.
 • उत्पन्नातील 30% भाग : आपल्या उत्पन्नामधील 30 टक्के भाग महागड्या वस्तूंची खरेदी किंवा फिरायला जाण्यासाठी, सलून साठी यांसारख्या गोष्टींसाठी वापरू शकतो. या गरजा प्रत्येकासाठी आवश्यक असतातच असे नाही आपण आपल्यासाठी योग्य गरजा ओळखून योग्य त्या गोष्टींची निवड करावी.
 • उत्पन्नातील 20% भाग : आणि उत्पन्नामधील 20 टक्के भाग हा नक्कीच बचत आणि गुंतवणूक करण्यासाठी वापरावा. हळूहळू ही टक्केवारी वाढवू शकता.

2. मासिक बजेट ठरवा –

 • आपण आपले मासिक बजेट ठरवले तर नक्कीच आपल्याला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी तर करता येताच त्यासोबतच बचत आणि गुंतवणूक सुद्धा करता येऊ शकते.
 • आता मासिक बजेटमध्ये घरभाडे,  बिले, वाहतूक, किराणा सामान, वैद्यकीय खर्च आणि कपडे यासारख्या ठराविक मासिक खर्चांमध्ये तुम्ही बजेटचे विभाजन करू शकता.
 • तसेच आपल्यावर जर काही कर्ज असेल तर ते कर्ज फेडण्यासाठीची सुद्धा रक्कम गृहीत धरणे गरजेचे आहे.
 • आपले छंद जोपासण्यासाठी तसेच मनोरंजन करण्यासाठी किंवा बाहेर जाण्यासाठी, खाण्यासाठी सुद्धा काही रक्कम गृहीत धरू शकता. 
 • अशाप्रकारे विविध खर्चासाठी थोडी थोडी रक्कम ठरवून योग्य पद्धतीने आपल्या उत्पन्नानुसार मासिक बजेट ठरवू शकता.

3. आपण करत असलेल्या खर्चाचा मागोवा घेणे –

 • आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला अत्यावश्यक असतात परंतु काही गोष्टी अशा सुद्धा असतात की ज्या आवश्यक नसून सुद्धा आपण खरेदी करत असतो किंवा त्यामध्ये पैसा घालत असतो.आपण योग्य गोष्टींमध्येच गुंतवणूक केली पाहिजे. 
 • उदाहरण द्यायचे झाले तर, आपण महिन्याला जो काही खर्च करतो त्याचा मागोवा घेणे गरजेचे आहे म्हणजेच आपण योग्य ठिकाणी खर्च करत आहोत का? ती गोष्ट खरंच आवश्यक आहे का हे सर्व बघणे आवश्यक आहे. समजा महिन्याला जास्त वेळा हॉटेलला जेवणे टाळून त्या ऐवजी आपण शरीरासाठी आवश्यक असणारे फळे खात आहोत का याचा सुद्धा विचार केला पाहिजे. अनावश्यक खर्च टाळून आवश्यक खर्च केला तर नक्कीच पैशांमध्ये बचत होऊ शकते.

4. योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक करणे –

 • पैशांची बचत करून योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे सुद्धा आवश्यक आहे. 
 • पैशांची गुंतवणूक करण्यासाठी आपल्यापुढे विविध पर्याय उपलब्ध आहे त्यावर आपल्या वेबसाईटवर विविध ब्लॉग उपलब्ध आहेत तसेच यूट्यूब चैनल वर सुद्धा विविध व्हिडिओज उपलब्ध आहेत. तरी अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर पोस्ट ऑफिसच्या विविध योजना, एस आय पी, शेअर मार्केट यांसारखे अनेक ऑप्शन्स गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहेत आपण आपले ध्येय लक्षात घेऊन योग्य गुंतवणुकीचा ऑप्शन निवडून गुंतवणूक करू शकतो. 

इतर काही टिप्स Money Saving tips :

– घरामध्ये बराच वेळा अनावश्यक असलेल्या वस्तू सुद्धा खरेदी केल्या जातात परंतु खरेदी करतेवेळी हे लक्षात नाही येत नंतर लक्षात येते त्यामुळे कोणतीही गोष्ट खरेदी करत असताना त्या गोष्टीची खरच गरज आहे का हा विचार करून खरेदी करावी. 

– तसेच हल्ली विविध सबस्क्रीप्शन प्लॅन मनोरंजनासाठी खरेदी केले जातात परंतु हे प्लॅन घेण्याची आवश्यकता आहे का ,त्याऐवजी फ्री मध्ये उपलब्ध असलेल्या कंटेंटच्या माध्यमातून सुद्धा आपले मनोरंजन होऊ शकते. त्यामुळे अनावश्यक सबस्क्रीप्शन प्लॅन रद्द करणे योग्य ठरू शकते. 

– तसेच जास्तीचे व्याज किंवा पेनल्टी टाळण्यासाठी आपले कर्ज किंवा ईएमआय वेळच्यावेळी भरणे आवश्यक आहे.

    अशाप्रकारे या काही पैसे वाचवण्याच्या ( Money Saving tips ) टिप्स नक्कीच आपल्याला मदत करणाऱ्या ठरू शकतात.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज कराhttps://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठीhttps://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment