व्यवसाय करू इच्छित असाल तर मिळवा व्यवसायासाठी कर्ज |Government Loan schemes for Businesses | 4 Good Government Loan Schemes

व्यवसाय करू इच्छित असाल तर मिळवा व्यवसायासाठी कर्ज |Government Loan schemes for Businesses  –

     आपल्या देशामध्ये विविध बरेचसे व्यक्ती असे आहेत की ज्यांच्याकडे शिक्षण आहे परंतु नोकरी नाही, किंवा शिक्षण घेण्याची इच्छा आहे परंतु शिक्षण घेण्यासाठी पैसा नाही असे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अडचणी आहेत परंतु बऱ्याच व्यक्तींना काहीतरी व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असते त्यासाठी त्यांच्याकडे कौशल्य सुद्धा असतात परंतु अडचण येते ती भांडवलाची. आजच्या लेखामध्ये आपण अशा काही सरकारी कर्ज योजना ( Loan schemes for Businesses ) बघणार आहोत.

Government Loan schemes

सर्वप्रथम सरकारी कर्ज योजनेचे फायदे बघुयात…

सरकारी कर्ज योजनांचे फायदे | Benefits of government loan schemes – 

– शक्यतो सरकारी कर्ज योजनांमार्फत मिळणाऱ्या कर्जावर व्याजदर कमी असते, त्यामुळे इतर कर्ज घेण्याचा विचार करण्यापेक्षा या योजनांमार्फत मिळणारे कर्ज घेणे कधीही फायदेशीर ठरू शकते.

– अनेक सरकारी योजना कोलॅटरल फ्री आहेत, ज्यामुळे छोट्या व्यवसायांना किंवा नवीन व्यवसायांना कर्ज मिळवणे सोपे होते आणि व्यवसाय सुरू करणे सुद्धा शक्य होते.

– सरकारी कर्ज योजनांसाठी अर्ज करण्याची पद्धत सहज आणि सरळ असल्याकारणाने अर्ज करण्यासाठी अडथळे येत नाहीत किंवा कमी अडचणी येतात.

– सरकारी कर्ज योजनेमार्फत मिळणारे कर्ज परतफेड करण्यासाठी परतफेडीचा कालावधी सुद्धा इतर खाजगी पद्धतीपेक्षा जास्त आहे.

– व्यवसायांसाठी मिळणारे हे कर्ज सरकारमार्फत सरकारी योजना अंतर्गत मिळणारे असल्यामुळे त्या ठिकाणी शंकेचा प्रश्न उरत नाही आणि विश्वास सुद्धा अधिक बसतो.

आता,विविध सरकारी कर्ज योजना ( Government loan schemes ) बघुयात…

सरकारी कर्ज योजना | Government loan schemes  –

 प्रधानमंत्री मुद्रा योजना ही मायक्रो, स्मॉल आणि मिडीयम इंटरप्राईजेसला (MSMEs ) दहा लाख रुपये पर्यंत कर्ज व्यवसायासाठी उपलब्ध करून देते.

– प्रधानमंत्री मुद्रा योजना पुढील तीन कॅटेगरीमध्ये उपलब्ध आहे :

१ . शिशू – कर्ज वाटपाची रक्कम 50,000 रुपयांपर्यंत

२ . किशोर – कर्ज वाटपाची रक्कम  50,000 ते 5,00,000 रूपयांपर्यंत

३ . तरुण  – कर्ज वाटपाची रक्कम 5,00,000 ते 10,00,000  रुपयांपर्यंत

:  येथे क्लिक करा.

– स्टँड अप इंडिया ही योजना महिला आणि समाजामधील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये उद्योजकतेला चालना देण्यासाठी आहे.

– स्टँड अप इंडिया या योजनेअंतर्गत दहा लाख रुपये ते एक कोटी रुपयांपर्यंत एससी/ एसटी किंवा महिला उद्योजकांद्वारे चालवल्या जाणाऱ्या स्टार्टअप आणि व्यवसायांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते.

– स्टँड अप इंडिया या योजनेद्वारे सेवा, व्यापार आणि उत्पादन या संबंधित क्षेत्रामध्ये व्यवसाय करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना कर्जाच्या स्वरूपामध्ये आर्थिक सहाय्य केले जाते.

– CGTMSE ही योजना दोन कोटी रुपयांपर्यंत कोलॅटरल फ्री लोन सध्या सुरू असलेल्या आणि नवीन एमएसएमईंना उपलब्ध करून देते.

– या योजनेअंतर्गत बँका आणि इतर फायनान्शिअल इन्स्टिट्यूशन एमएसएमईंना उपलब्ध करून देते.

– कर्जाच्या रकमेच्या 75 टक्के पर्यंत क्रेडिट हमी सरकार देते.

 राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ (NSIC) सबसिडी योजना ही क्रेडिट रिलेटेड सबसिडी देते जसे की मार्केटिंग, टेक्नॉलॉजी अपग्रेड्स , कच्चामाल खरेदी आणि एमएसएमईसाठी थकबाकीची  वन टाइम सेटलमेंट यासाठी आर्थिक सहाय्य देते.

    ज्या व्यक्तींना व्यवसाय सुरू करायचा असेल त्या व्यक्तीने नक्कीच सरकारतर्फे मिळणाऱ्या कर्ज योजनांचा ( Government loan schemes) लाभ घेऊन व्यवसाय सुरू केले पाहिजे.

⭕ कार ॲक्सेसरीज व्यवसाय 

⭕Car accessories business

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

⭕ होऊ शकते 2 लाखांपर्यंत कर्ज माफ…

⭕ जाणून घ्या नक्की काय आहे योजना..

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

Leave a Comment