Give it up scheme / Give It Up Subsidy: सरकारतर्फे घेण्यात आला मोठा निर्णय, महाराष्ट्र राज्य ठरलं हा निर्णय घेणारं देशामधील पहिलं राज्य

Give it up scheme / Give It Up Subsidy: सरकारतर्फे घेण्यात आला मोठा निर्णय, महाराष्ट्र राज्य ठरलं हा निर्णय घेणारं देशामधील पहिलं राज्य  
Give it up subsidy
     महाराष्ट्र राज्य हे “गिव्ह इट अप स्कीम” ही योजना सुरू करणारे भारतामधील पहिलेच राज्य ठरले आहे. महाराष्ट्र राज्य सरकारकडून Give it up subsidy ही योजना सुरू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत सरकारी योजनांचा लाभ परत करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
   गिव्ह इट अप हा पर्याय महाडीबीटी या पोर्टलवर उपलब्ध होणार आहे. जवळपास शासनाच्या विविध 65 योजनांसाठी हा पर्याय उपलब्ध होणार आहे. जे लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत अशा लोकांना शासनाचे लाभ नाकारण्यासाठी डीबीटी पोर्टलवर हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. जे लोक आर्थिक दृष्ट्या सक्षम असतील आणि त्यांना सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा नसेल तर ते हा लाभ नाकारू शकतात आणि हा लाभ नाकारण्यासाठी सरकारतर्फे महाडीबीटी पोर्टलवर Give it up हा पर्याय उपलब्ध होणार आहे. असा निर्णय घेणारे महाराष्ट्र राज्य हे भारतामधील पहिले राज्य ठरले आहे ही अतिशय कौतुकास्पद अशी गोष्ट आहे, नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच सरकारतर्फे हा निर्णय घेण्यात आलेला आहे ही सुद्धा एक आनंदाची गोष्ट आहे.
    भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांच्या मागणी नंतर  प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.आमदार श्रीकांत भारतीय म्हणाले की , “महाराष्ट्र शासनाच मनपूर्वक अभिनंदन करतो. सामान्य माणसांसाठी एक जीआर काढला. मी विधानपरिषदेत लक्षवेधी भूमिका मांडली होती की, ज्या ज्या लोकांना असं वाटतं की मला मिळालेलं अनुदान, मला मिळालेली सवलत ही मी समाजासाठी परत करू शकतो. त्या अंतर्गत अशा प्रकारची सिस्टीमच शासनामध्ये उपलब्ध नव्हती.”
   पुढे ते असेही म्हटले की ”आज महाराष्ट्र शासनाने एक जीआर काढला आणि त्यात कोणत्याही व्यक्तीला अनुदान परत करायच असेल तर तो ते परत करू शकतो, अशी सिस्टीम तयार केली. मी मनापासून शासनाचे अभिनंदन करतो आणि मी समाजाला देखील अपील करतो, की आपल्याला मिळालेल अनुदान जर आपल्याला नको असेल तर ते गरिबांसाठी सर्वात जास्त उपयुक्त ठरेल.”

महत्त्वाचे मुद्दे :

 – 23 ऑगस्ट 2023 रोजी उपमुख्यमंत्री ( वित्त ) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठक झाली त्यात केंद्र शासनाच्या Give It Up Subsidy  उपक्रमाप्रमाणेच राज्य शासनामधील महाडीबीटी पोर्टलवर असलेल्या योजनांसाठी Give it up subsidy हा उपक्रम राबवण्यात येईल.
– सध्या Give It Up Subsidy ही महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध असलेल्या 65 योजनांसाठी राबवण्यात येईल परंतु भविष्यामध्ये महाडीबीटी पोर्टलवर येणाऱ्या इतर योजनांकरिता सुद्धा Give It Up Subsidy राबवण्यात येईल.

Give It Up Subsidy प्रक्रिया –

– Give It Up Subsidy हा पर्याय संबंधित योजनांसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाल्यानंतर अर्जदाराला निवडता येईल.
–  Give It Up Subsidy पर्याय निवड केल्यानंतर प्रस्तूत पर्याय निवडीबाबतच्या खात्रीकरीता pop-up window मध्ये सूचना येईल.
– सदर सूचना मान्य केल्यानंतर अर्जदारास मोबाईलवर OTP प्राप्त होईल.
– हा OTP अर्जदारास वेबसाईटवर टाकायचा आहे व Give It Up Subsidy ची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
    अशाप्रकारे महाराष्ट्र सरकारने Give It Up Subsidy सुरू करण्याचा निर्णय घेतलेला असून हा निर्णय अतिशय कौतुकास्पद आहे. खरोखरच जर ज्या लोकांना सरकारी योजनांची आवश्यकता नाही म्हणजेच जे लोक आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत त्यांनी जर सरकारी योजनांचा लाभ घेतला नाही तर हा लाभ इतर लोकांना घेता येईल आणि इतर लोकांची सुद्धा आर्थिक परिस्थिती सुधारण्यामध्ये मदत होऊ शकते.

हे ही वाचू शकता…

⭕ व्यवसाय यशस्वी करण्यासाठी काही बिझनेस टिप्स

⭕Business Tips in Marathi

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://www.viral-talk.in/business-tips-in-marathi/?amp=1

बुक स्टोअर बिझनेस 

How to start book store business?

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://iconikmarathi.com/book-store-business/?amp=1

Leave a Comment