कपड्यांचा व्यवसाय | Clothing Business |Best business ideas 2024 –
अन्न, वस्त्र आणि निवारा यापैकीच एक असणारी मनुष्यांची गरज म्हणजे कपडे. तर आपल्या सगळ्यांनाच विविध प्रकारचे, वेगवेगळ्या रंगांचे कपडे घालायला आवडतात. कपड्यांची स्टाईल देखील फॅशन नुसार बदलत राहते. कुठल्याही खास प्रसंगी कपड्यांची लगेच खरेदी केली जाते. कपडे ही एक आपली गरज असल्यामुळे ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी जर कपड्यांचा व्यवसाय सुरू केला तर नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. सुरुवातीला थोडासा अनुभव येईपर्यंत काही लोक घरूनच हा व्यवसाय सुरू करतात. नंतर हळूहळू जसजशी तुमची गुंतवणूक वाढत जाईल तसतसे तुम्ही मोठ्या प्रमाणावर अगदी होलसेल कपड्याचे दुकान देखील नक्कीच सुरू करू शकता.
Table of Contents
कपड्यांचा व्यवसाय | Clothing Business |Best business ideas 2024 –
१. कपड्यांचे विविध प्रकार| Different types of clothes –
आपल्या भारत देशामध्ये प्रत्येक राज्यानुसार कपड्यांची शैली थोडी थोडी बदलत जाते, परंतु प्रत्येक राज्यातील कपड्यांची काही ना काहीतरी खासियत असते,जसे की महाराष्ट्रातील नऊवारी प्रसिद्ध आहे तसेच प्रत्येक राज्यातील काहीतरी पेहराव प्रसिद्ध आहे. चला तर बघुयात कपड्यांचे कोणकोणते प्रकार पडतात –
कपड्यांच्या प्रकाराची सुरुवात आपण अगदी रुमालापासून करू शकतो त्यानंतर साडी, शर्ट, पॅन्ट, कुर्तीज, ब्लाउज, ड्रेस मटेरियल, टॉवेल्स, सॉक्स, इनर वेअर, सन कोट्स, रेनकोट, टी-शर्ट, स्वेटर्स, मफलर, स्कार्फ, टोपी अशा प्रकारचे अनेक कपडे तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकता. कपड्यांमध्ये जास्त व्हरायटी असली तर ग्राहक देखील नक्कीच आकर्षक होतात.
२. कपड्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यवसाय योजना | Business planning for starting clothing business –
– कपड्यांचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुम्ही योग्य पद्धतीने व्यवसाय योजना आखली पाहिजे.
– या योजनेमध्ये तुम्ही कपड्यांचा व्यवसाय कुठे सुरू करणार आहात, किती मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय सुरू करणार आहात, कोणकोणत्या प्रकारचे कपडे तुम्ही विकण्यासाठी ठेवणार आहात, तुम्ही होलसेल दरात कपडे कुठून आणणार आहात, हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कुठले लायसन्स काढावे लागेल, साधारणतः आर्थिक दृष्ट्या किती खर्च येऊ शकेल या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो.
– व्यवसाय योजना तयार केली की त्याचा फायदा व्यवसाय यशस्वी करण्यामध्ये नक्कीच होतो.
३. कपड्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे आवश्यक परवाने | Licence required for starting clothing business –
– कपड्यांचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुमच्या व्यवसायाचे तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल.
– हा व्यवसाय सुरू करण्यासाठी ट्रेड लायसन्स तुम्ही काढू शकता. त्याचबरोबर जीएसटी रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे.
४. होलसेल दरात कपड्यांची खरेदी | Shopping of clothes in wholesale rate –
एकदा की तुम्ही कपड्यांचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला की लगेच मार्केटचा अभ्यास करून कुठे – कुठे होलसेल दरात कपडे मिळतात हे जाणून घेतले पाहिजे , जेणेकरून तुम्ही होलसेल दरात कपडे घेऊन रिटेल दरात
विकू शकता. होलसेल दर जेवढा कमी तेवढाच जास्त प्रॉफिट मिळू शकेल.
५. कपड्यांच्या शॉपची रचना किंवा मांडणी | Design or layout of a clothing shop –
– कपड्यांच्या शॉपचे फर्निचर किंवा इतर रचना आकर्षक पद्धतीने केली तर ग्राहक वर्ग नक्कीच आकर्षक होण्याचे प्रमाण वाढते.
– तसेच फर्निचर झाल्यानंतर कपड्यांची मांडणी आणि प्रेझेंटेशन योग्य पद्धतीने केले पाहिजे. कारण बऱ्याचदा ग्राहकाला जर बाहेरून बघितल्यावर कपड्याचे दुकान किंवा त्यातील कपडे आवडले तरच तो ग्राहक दुकानांमध्ये जातो.
६. कपड्यांच्या किमती | Prices of clothes-
– कपड्यांचे दुकान सुरू केल्यानंतर सुरुवातीला जर आजूबाजूच्या कपड्यांच्या दुकानापेक्षा कपड्यांच्या किमती थोड्याशा कमी ठेवल्या परंतु कॉलिटी चांगली ठेवली तर ग्राहक वर्ग नक्कीच तुमच्या दुकानाकडे येईल .
– नंतर देखील इतर दुकानांपेक्षा तुम्ही कपड्यांची किंमत योग्य ती ठेवू शकता. तसेच काही दिवसांमधून कपड्यांवर काही ऑफर्स देखील ठेवू शकता.
७.संवाद कौशल्य | Communication skills –
कपड्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कम्युनिकेशन स्किल्स चांगले असणे फार गरजेचे आहे. ग्राहकाशी कसं बोलावं किंवा ग्राहकाला कपड्यांची माहिती कशी द्यावी हे शिकून घेणे गरजेचे आहे.
८. कपड्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहे | Which things are necessary for starting clothing business –
– कपड्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक चांगली जागा लागेल.
– तसेच कपड्यांच्या व्यवसायासाठी फर्निचर, रॅक्स, काउंटर इत्यादी लागेल.
– त्याचबरोबर इलेक्ट्रिसिटी लागेल.
– नंतर ग्राहकांना बसण्यासाठी गाद्या किंवा कार्पेट्स लागतील.
– कपड्यांचे प्रेझेंटेशन करण्यासाठी काही स्टेचुज लागतील. – इतर छोट्या वस्तू जसे की कपडे पॅक करण्यासाठी बॅग लागतील.
– कपड्यांचा व्यवसाय सुरू केल्यानंतर काही कामगारांची देखील आवश्यकता भासू शकेल.
९ .कपड्यांच्या व्यवसायाची मार्केटिंग कशी करावी | How to do marketing of clothes –
– कपड्यांचा व्यवसाय सुरू केल्यानंतर तुम्ही तुमच्या शॉपचे ठीक ठिकाणी बॅनर लावू शकता.
– तसेच सोशल मीडियाच्या सहाय्याने देखील कपड्यांच्या व्यवसायाची मार्केटिंग करू शकता.
– तुम्ही ऑनलाईन देखील विविध वेबसाईटवर कपडे सेल करू शकता.
– तसेच तुम्ही स्वतःची देखील वेबसाईट बनवू शकता आणि त्यावर कपडे सेल करू शकता.
– तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू करू शकता. आज-काल बरेच लोक यूट्यूब चॅनल वर त्यांच्या दुकानांमध्ये असलेल्या कपड्यांच्या व्हरायटीजचे व्हिडिओज बनवतात. बरेचसे ग्राहक युट्युबवर व्हिडिओज बघून तुमच्या दुकानांमध्ये येऊ शकता.
– तुम्ही फेसबुक लाईव्ह देखील करू शकता.
– तुम्ही टीव्ही, वर्तमानपत्रे तसेच एफ एम रेडिओ वर देखील जाहिरात देऊ शकता.
⭕ Poha Making Business
⭕ पोहे बनवण्याचा व्यवसाय
⭕जाणून घ्या अधिक माहिती…
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
⭕ श्रीराम मंदिर महोत्सवानिमित्त नवीन योजना जाहीर…
⭕जाणून घ्या काय योजना आहे…
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻